मी देहरेकर, बोलतोय करोनावर
जागतिक महामारी ,कलह व शिथिलता म्हणजे करोना आपल्या देशात आजपर्यंत वेगवगळे आजार होऊन गेले , पण करोनाने पूर्ण जग शांत केले. करोना मुळे सर्व जागतिक, आर्थिक राजकीय, सांस्कृतिक, आध्यत्मिक क्षेत्राचा विकास ठप्प झाला आहे. गोर गरिबांचे खाण्यापिण्याचे हाल, मजुरांचे स्थलांतराचे हाल सर्व हालच हाल पाहून मन सुन्न झाले. आउट डोअर खेळ म्हणजे क्रिकेट,फुटबॉल स्थब्ध होऊन घरगुती कॅरम बुद्धिबळ चंपल, सबसिडी ,जोमात आहेत. आजी, आजोबा, नातू, भाऊ, बहीण सर्व करोनामुळे एकत्रित नांदत आहे.
![]() |
| प्रा. सुहास बाबासाहेब पाखरे. |
करोनाची लक्षणे पूर्णतः अजूनही कोणालाही समजली नाहीत पण करोनापासून सुरक्षितता म्हणजे मास्क वापरणे, सुरक्षित आंतर ठेवणे, घरातच राहणे. हे तर आपल्याच हातात आहे. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांपासून सर्व सरकारी यंत्रणा आपल्या सर्वांसाठी कार्यरत आहेत. विविध प्रकारच्या आर्थिक सुविधेसह रेशन प्राप्त करून दिले आहे. करोनामुळे काही प्रमाणात निर्व्यसनी पणा वाढला आहे . लॉकडाउन उठल्यावर काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. सर्व शिक्षित लोकांना माझी विनंती आहे कि, सोशल मीडियावर कोवीड १९ च्या जनजागृती बाबत ऑनलाईन परीक्षा होतात. त्या आपणही द्याव्यात .आपल्या नक्कीच करोना बाबत खबरदारी ची माहिती मिळेल.आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.
लहान मोठा , जाती पाती,वंश वर्ग त्यावर करोनाने मातकरून मानवता हाच खरा धर्म शिकविला. आता आपण करोना ला ग्राह्य धरूनच प्रशासनाला सहकार्य करूनच समाजात वावरले पाहिजे. हा महाराष्ट्र पुनः उभा करण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. मी परिक्रमा शैक्षणिक संकुलात एम.बी. ए महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना व समाजाला करोना पासून सुरक्षित राहण्याचे मार्गदर्शन करतो . आपणही आपल्या भागात अग्रेसर होऊन हि मोहीम हाती घेतली. पाहिजे.
आपले घर हेच करोना मुक्त सुंदर जीवन.
विचारपुष्प
प्रा. सुहास बाबासाहेब पाखरे.
प्राध्यापक. परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे एम .बी. ए महाविद्यालय काष्टी.
श्रीगोंदा जि. अहमदनगर
मूळ रहिवाशी देहरे ता. नगर जिल्हा अहमदनगर


