हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.20 कोरोना ह्या संसर्गजन्य विषाणू महामारी ने गेली तीन महिने संपूर्ण देशात भितीदायक वातावरण तयार करून तमाम जनतेला सळो की पळो केले आहे. आज देशाने १ लाखा चा आकडा पार करत महाराष्ट्र राज्यात ३७ हजारावर बाधित संख्या आहे. आज महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक रूग्ण आहेत.
लोखसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात १ लाख डॉक्टर्स ची कमतरता जाणवत आहे. राज्यात पुष्कळ भागात खासगी अँलोपॅथी/आयुर्वेदीक डॉक्टर्स आपले दवाखाने बंद करून बसलेत. आज कोरोनाच्या स्वरूप बघता १ लाख च्या वर डॉक्टर्स ची गरज आज कोरोना महामारीशी लढण्यासाठी पाहिजेत. राज्यात ५० हजार च्या वर होमिओपॅथी (BHMS/ MD) महामारी शी लढण्यासाठी तयार आहेत पण आपल्याच काही सहयोगी वैद्यकीय संघटना व आरोग्य खात्यातील राजकारण सदर होमिओपॅथी डॉक्टर्सच्या भरतीला आडवे येत आहे. आज नांमाकीत अलोपँथी रूग्णांलयांचे संचालक होमिओपॅथी ची औषधे कोरोना विषाणू ला रोखण्याकरीता रोग प्रतिकारशक्ती म्हणून वापर करत आहेत. आयुष मंत्रालयाने सुद्धा सुचविलेले होमिओपॅथी अौषधाचा वापर प्रभावीपणे काम करत आहे. जर आपल्या सरकारला होमिओपॅथी औषधे चालत असतील तर मग जि.प.,महानगरपालिका, कुटूंब आरोग्य कल्याण विभाग राज्य आरोग्य विभाग ई.भरती मधून होमिओपॅथी डॉक्टर्सना का डावलले जाते? आज राज्यात ४७ खाजगी होमिओपॅथी ची महाविद्यालय आहेत. ५० हजार च्या वर रजि. डॉक्टर्स शासकीय भरती होत नसल्यामुळे बेरोजगार आहेत. जर शासकीय नौकरी / भरती होत नसेल तर मग ह्या महाविद्यालयांना परवानगी का दिली? होमिओपॅथी ची शासकीय महाविद्यालय का नाहीत?
आज कोरोना महामारी शी लढत असतांना आपली आरोग्य यंत्राणा कमी पडत आहे. आपले सरकार आजी/माजी डॉक्टर्सना मदती साठी पूढे येण्याचे आवाहन करत आहे . पण होमिओपॅथी डॉक्टर्स ना दुर्लक्षीत करून चालणार नाही. लवकरात लवकर सदर होमिओपॅथी डॉक्टर्स चा भरती निर्णय मार्गी लावावा व भरतीचा आदेश काढावा आणि न्याय द्यावा अन्यथा लवकरच मराठवाडा जनविकास पदवीधर समिती, होमिओपॅथी डॉक्टर्स व विद्यार्थी संघटना मोठ्या संख्येने भविष्यात रस्तावर उतरतील. अशी माहिती पदवीधर समितीचे अध्यक्ष डॉ रोहित बोरकर यांनी दिली. सदर झालेल्या बैठकीतील चर्चे मध्ये डॉ सुनिलसिंग राजपूत, डॉ गोविंद सारडा, डॉ सिद्धेश्वर तळेकर, डॉ किरण घुले, डॉ अभिजीत पवार, डॉ ज्ञानेश्वर राऊत, डॉ रूषिकेश ठोबरे,डॉ योगेश तळेकर,डॉ छाया,डॉ योगिता,डॉ अभिरूची ई. उपस्थित होते.
मागणी खालील प्रमाणे:-
१.BHMS डाॅक्टरांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
२.BHMS शास्त्राच्या डॉक्टर्स ला COVID पेशंट्स ला कोरोणामुक्त करण्यासाठी AYUSH ने ठरवुन दिलेली होमिओपॅथिक औषधे काॅविड हाॅस्पिटल मध्ये वापरण्यास परवानगी द्यावी.
३.ड्युटी मेडीकल ऑफिसर(DMO) पदासाठी BHMS डॉक्टरांना प्राधान्य द्यावे
४.किमान वेतन हे सर्व वैद्यक शास्त्रातील डाॅक्टरांना समान असावे.
५.शासकिय सेवेत BHMS डाॅक्टर्स ला किमान वेतन व समान संधी देण्यात यावी त्यात BAMS आणि BHMS यांच्या वेतनात तफावत नसावी.


