🙏🚩जय श्रीराम 🚩🙏
हिंदु रक्षक धर्म परिषद
धार्मिक व सामाजिक संघटना
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जाचा नमुना हिंदु रक्षक धर्म परिषद यांच्याकडे उपलब्ध असून ३१ जानेवारी २०२१पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना सरकारच्यावतीने मानधन देण्याची योजना राबवली जाते. या योजनेसाठी कलाकार निवड करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली असून समिती प्रती जिल्हा शंभर कलाकारांची निवड करते. सध्या मानधन घेत असलेल्या कलावंतांनी त्यांचे हयातीचे दाखले जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे सादर करावेत. दाखले सादर न करणाऱ्या कलावंतांचे मानधन एप्रिल २०२० पासून रोखण्यात येईल.
तसेच ज्या कलावंतांना मानधन मंजूर आहे पण काही कारणास्तव त्यांचे मानधन थांबले आहे. अशा कलाकारांनी कार्यालयाकडे संपर्क साधावा. त्यासाठी +91 99213 14814 किंवा +91 80808 79131
या फोन वर संपर्क साधावा. कलावंतांनी त्यांच्या तालुक्यातील पंचायत समितीकडे किंवा जिल्हा परिषदेकडे तसेच बृहन्मुंबई व उपनगरातील कलावंतांनी त्यांचे अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय जुने सचिवालय, पहिला मजला, विस्तार भवन, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२, या ठिकाणी सादर करावेत. ३१ जानेवारी २०२१ नंतर प्राप्त होणारे कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
ह.भ.प.प्रविण महाराज शिंगणापुरे
राष्ट्रीय संपर्क प्रमुख
मो.+91 93406 54023
ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज मोहिते
महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख
मो.+91 99217 21861


