shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

थेरगावमधील युवा उद्योजकांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिसांना मास्क वाटप..!

पिंपरी-चिंचवड:  महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने थेरगाव परिसरातील युवा उद्योजक अक्षय ढमाले आणि अक्षय परदेशी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ४०० मास्क व गुलाबपुष्पचे वाटप केले. निगडी, प्राधिकरण, बिजलीनगर, चिंचवडगाव, रावेत तसेच वाकड येथे बंदोबस्तास असलेल्या पोलिस बांधवांना मास्क व गुलाबांच्या फुलांचे वाटप करण्यात आले.



महाराष्ट्र दिनानिमित्त गणेशनगर डांगे चौक, थेरगाव परिसरात अक्षय ढमाले यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. तर अक्षय परदेशी हे बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. या युवा उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या या लढाईत दिवस-रात्र मेहनत करणाऱ्यापोलीस बांधवांना मदतीचा एक हात दिला आहे. शहरातील निगडी, प्राधिकरण, बिजलीनगर, चिंचवडगाव, रावेत, वाकड येथील बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन पोलीस बांधवांना ४०० मास्क दिले. तसेच गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अक्षय परदेशी यांनी हेल्पलाइन नंबर, जनावरांना चारा, गरजूंना धान्यांची मदत इत्यादी उपक्रम राबविले आहेत.
close