पुणे । प्रतिनिधी ।
देशात व राज्यात कोरोना वैश्विक महामारीने थैमान घातले आहे,त्यामुळे सध्या लाॅकडाऊनमुळे सर्व काहि ठप्पच आहे .अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी हातावर पोट असणार्या,हाताला काम नसल्यामुळे मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, त्यांना सहकार्य करणे गरजेचे असते या हेतूने गोल्डन ग्रामीण धर्मादाय विकास संस्थेने ग्रामपंचायत सुपे खुर्द,ता पुरंदर,जि.पुणे या ठिकाणी अनेक गरिब कुटुंब,हातावर पोट असणारे मजूर आहेत,त्यांची दयनीय अवस्था पाहून या संस्थेचे सचिव मा.विकी रमेश शिंदे ,कोथरुड यांनी एक सामाजिक बांधिलकी ठेऊन त्यांना गहु,गव्हाचे पीठ,मिरचि पावडर,तेल,सोयाबीन,साखर चहा-पावडर,मसाला,पोहे,मटकी दाळ,डेटाॅल साबण,कपड्याचे साबण इत्यादी वस्तू असलेले 200 किट देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे.
गोल्डन ग्रामिण धर्मादाय विकास प्रतिष्ठाणने आतापर्यंत महिला विकास योजना,विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम,वधू-वर,पालक परिचय मेळावे,शाळेतील विद्यार्थीनीसाठी मोफत सॅनिटरी पॅड,वह्या पुस्तके,बॅग,कपडे देऊन आपल्या सामाजिक कामाचे प्रतिबिंब उमटवले आहे.तसेच गरिब होतकरूंना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य ,काहिंना परदेशात जाण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात ही संस्था नेहमी अग्रेसर असते. अशा प्रकारे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम वर्षभर राबविले जात असल्यामुळे गोल्डन ग्रामीण धर्मादाय विकास प्रतिष्ठाण ही सामाजिक संस्था कौतुकास पात्र ठरली आहे.



