shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंत्ती घराघरातच साजरी करा:-संकेत नाईक

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.27,सध्या जगावर कोरोना संकटाच्या उपाययोजनेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असतांना सर्व सण,ऊत्सव व जयंत्ती घराघरातच साजरी करण्यात येत आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंत्ती असल्याने सर्व समाज बांधवानी घराघरातच जयंत्ती साजरी करावी असे आवाहन धनगर समाज युवा नेते संकेत नाईक यांनी केले आहे.


कोरोना संकटामुळे शासनाच्या आदेशानुसार सहकार्य करीत त्यांच्या विचार सरणीची गरज असल्याने सर्व समाज बांधवानी आपआपल्या परीने कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला आधार देत कोरोनाच्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सामाजिक उपक्रम घेऊन प्रत्येक घरात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे कुटुंबियांने एकत्र येऊन पुजन करून जयंत्ती साजरी करून शासनाने कोरोना संकटाच्या
उपाययोजनेसाठी वेळोवेळी केलेल्या सुचनेचे पालन करीत आपण आपल्या परीवाराची काळजी घेऊन त्यांच्या विचाराप्रमाणे सहकार्याची भुमिका घ्यावी असे आवाहन सेनगांव तालुका अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती च्या वतीने भास्करराव बेंगाळ,गंगाराम फटागंळे,संकेत नाईक,अविनाश खताळ,अमोल हराळ,आत्माराम कुंदर्गे,संजय चिलगर,घनश्याम हराळ,नारायण भोपाळे,रामेश्वर पोले,सुनिल शिंदे,माऊली लोहटे,सुनिल काळे,संदीप होडबे यांनी आवाहन केले आहे.
close