५ मे जागतिक व्यंगचित्रकार दिन निमित्त.
- व्यंगचित्रातून मनोरंजनाबरोबर प्रबोधनही करणारे व्यंगचित्रकार - दीपक महाले.
अहमधनगर। प्रतिनिधी : ५ मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हजारो शब्दांतून व्यक्त होणारा आशय केवळ एका व्यंगचित्रातून मांडने शक्य असते. व्यंगचित्र हा वर्तमानपत्राचा अविभाज्य घटक आहे. दिवाळी अंकात व्यंगचित्रांना मानाचे स्थान आहे. अनेक पुस्तकांच्या मुखपृष्ठावर व्यंगचित्रे रेखाटलेली असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून मराठी माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली.![]() |
| व्यंगचित्रकार श्री. दीपक महाले |
व्यंगचित्रकार दीपक महाले शिक्षक असून फावल्या वेळी व्यंगचित्रे रेखाटतात .अनेक दैनिकातून , दिवाळी अंकातून त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित होतात. कोरोना या विषयावर प्रबोधन करणारी अनेक व्यंगचित्रे त्यांनी रेखाटली.सोशल मिडीयावर त्यांची अनेक व्यंगचित्रे व्हायरल होतात. विविध साहित्य संमेलनातून त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदश॔न आयोजित केले जाते. शौचालय, मोबाइल, पर्यावरण ,वृक्षारोपण ,स्वच्छता , शहरीकरण इ.विषयांवरील त्यांची व्यंगचित्रे मनोरंजनाबरोबर प्रबोधनही करतात.
●●" माणूस हसावा, आनंदी व्हावा तसेच प्रबोधनही व्हावे असा उद्देश व्यंगचित्रे रेखाटताना असतो "...दीपक महाले- व्यंगचित्रकार. ●●



