हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.04 मे हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील पोलीस स्टेशनच्या वतीने वृध्द,निराधार,अपंग व बाळांतपण रूग्णासाठी सेनगांव पोलीस स्टेशनच्या वतीने मोफत वाहनाची व्यवस्था करण्यात आली असुन आज दि.04 मे सोमवार रोजी सेनगांव नगरपंचायत चे नगरसेवक उमेश देशमुख यांच्या शुभहस्ते त्या वाहनाचे उदघाटन झाले असुन मोफत वाहन उपक्रमाला सुरूवात झाली.
सध्या कोरोना विषाणुचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकारने संचारबंदी लागु केली आहे.संचारबंदीमुळे सर्व प्रकारच्या वाहनांना देखील बंदी आहे अशा बिकट परीस्थितीत वृध्द,निराधार,अपंग व बाळांतपण अशा रूग्णांना तातडीने उपचार अत्यावश्यक असल्यास दवाखान्यामध्ये घेऊन जाणे किंवा स्वत: जाणे करीता अडचणी येत आहेत.त्यामुळे हिंगोली जिल्हा पोलीस अधिक्षक योगेश कुमार साहेब व अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे साहेब यांच्या संकल्पनेतुन सेनगाव पोलीस स्टेशन च्या वतीने वृध्द,निराधार,अपंग व बाळांतपण अशा रूग्णांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात जाणे किंवा नेणे अत्यावश्यक असल्यास सेनगाव पोलीस स्टेशन च्या वतीने मोफत वाहन सेवा संचारबंदी काळामध्ये 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.या मोफत वाहनाचे सेनगाव नगरपंचायतचे नगरसेवक उमेश देशमुख यांच्या शुभहस्ते करून मोफत वाहन सेवेला सुरूवात देखील करण्यात आली आहे.तरी गरजु रूग्णांनी या वाहन सेवेचा लाभ घेण्याकरीता खालील नमुद पोलीस अधिकारी किंवा सेनगाव पोलीस स्टेशनच्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांनी केले आहे.
पो.नि.सरदारसिंग ठाकुर:-
9823184558,9423184558
पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव:-
9923795077
सेनगांव पोलीस स्टेशन:-
8669900684