shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे निधन

पिंपरी-चिंचवड, पुणे:
पुण्याचे विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी तथा नुकतीच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अपर आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेले साहेबराव गायकवाड यांचे आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. एक कार्यक्षम व उमदा अधिकारी गमावल्याने त्यांच्या मित्र परिवारासह पिंपरी चिंचवडमधील अनेक अधिकारी, कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त केली आहे.



साहेबराव गायकवाड हे अतिशय मनमिळावू अधिकारी म्हणून महसूल विभागात परिचित होते. १७ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची पुणे येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. तेथेही त्यांनी आपल्या उत्कृष्ठ कामाचा ठसा उमटवला होता. मात्र, राज्यात सरकारची खांदेपालट होताच त्यांची बदली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली होती. असे असताना आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी त्यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एका मुलगा आहे. त्यांच्यावर त्यांचे मूळ गाव रिधोरे, ता. माढा, जि. सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. अतीशय कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी हरपल्याने पिंपरी चिंचवड, पुणे व सातारा महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
close