श्रीरामपूर/प्रतिनिधी: तुटपुंज्ये कमिशनवर कितीही इमाने,ऐतबारे सेवा देणारा तरीही संपूर्ण आयुष्यभर काळाबाजारी,भ्रष्टाचारी असं बदनामीचं खापर माथ्याशी घेऊन फिरणारा तथा गोर-गरीबांना त्यांच्या हक्कांचं शिधा (रेशन) पुरविणारा रेशन दुकानदार देखील आजच्या मितीस अंत्यत महत्वाची भूमिका बजावत असताना त्याच्या सद्कार्याची कोणीच दखल घ्यायला तयार नाही, या लढाईत काम करणार्या सर्वांचा उल्लेख होत असला तरी खरा योध्दा कसलीही अपेक्षा न करता लढत आहे. पोटात काही (अन्न) असल्याशिवाय आपण ही कोरोना विरुध्दची लढाई कशी लढू शकणार ? हे ही तीतकचं सत्य आहे, आणि ही महत्त्वाची रसद (अन्नधान्य) पुरविण्याचं काम आज सर्वच रेशन दुकानदार करत आहेत, म्हणून"कोरोनाकाळात संकटांशी लढण्याचं बळ देणारा" रेशन दूकानदार" देखील आजच्या मितीस कोरोना योद्धाच"ठरत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे,
केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने कोविड १९ (नोबेल कोरोना) या महाभयंकर आजाराशी मुकाबला करण्यासाठी सर्वच स्थरातून अनेक प्रयत्न चालू आहेत, तसेचकोरोनाशी लढताना वैद्यकिय, पोलिस,सफाई कामगार, आरटीओ, महसूल, बैंकींग, पत्रकार (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया) वाहतूक, कॄषी, शेतकरी, सहकार,धर्मदाय/सामाजिक संस्था, अत्यावश्यक सेवा पुरविणारे इत्यादींचं देखील याकामी फारच महत्त्वाचं आणि मोठं योगदान आहे हे जरी शत प्रतिशत सत्य असले तरी, अत्यावश्यक सेवेमध्ये अत्यंत महत्वाची सेवा बजावणार्या रेशन दुकानदारांचा समावेश कसा नाकारता येवू शकणार ?,
मात्र यामध्ये अपवादात्मक अनेक बाबी असू शकतात,जसे काही लोभी रेशन दुकानदार लाभार्थींना अन्नधान्य देत नाहीत,वेळेवर आपली दुकाने उघडत नाहीत, काळा बाजार करतात, पकडलेही जातात,काही रेशन दुकानांवर कारवाईही केली जाते, विविध वर्तमानपत्रे,वॄत्तवाहिन्यांवर अशा आशयाच्या बातम्याही झळकल्या जातात, मात्र सर्वच रेशन दुकानदार असे गैरकृत्य करतात असे मुळीच म्हणता येणार नाही, यंत्रणेत एखादा बेजबाबदार असला म्हणजे यंत्रणाच भ्रष्ट आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही, याउलट कित्येक रेशन दुकानदार असेही आहेत की ते लाभार्थ्यांना कॉल (फोन) करुन सांगतात की दुकानात आपले रेशन आलेले आहे, आपण घेऊन जावेत, मग अशा खर्या आणि प्रमाणिक रेशन दुकानदारांना कसे गैरकारभारी म्हणता येणार ?, पुर्वीची वेळ वेगळी होती,आजची वेळ वेगळी आहे, शासनाने रेशन प्रणालीमध्ये मोठी पारदर्शिता आणली आहे,
पारदर्शकतेसाठी आज पॉस मशिन आहे, लाभार्थ्यांचे थम्स (आंगठे) घेतले जातात,त्यावर त्यांना रेशन दिले जाते,मग गैरकारभाराचा मार्ग उरतोच कुठे ?, ही बाब खरच आज विचार करण्यासारखी आहे,आज कोरोनाच्या लढाईत सर्व काही माहीत आसतानाही जिवाची पर्वा न करता स्वस्त दरात अन्नधान्य वाटपाचे महत्वाचे कार्य करणारा रेशन दुकानदार सर्व सोयी सवलती पासुन आजतागायत वंचितच राहीलेला आहे, रेशन दुकानदारांचा शासनाने विमा तर सोडाच परंतु त्यांना साधे सँनिटायझर देखील पुरविलेले नाहीत तरी देखील रेशन दुकानदार कसलीही अपेक्षा न ठेवता जिवावर उदार होवुन काम करत आहे, धान्य नेण्यासाठी जर एखादी बाधीत व्यक्ती (रुग्ण) दुकानात आली तर दुकानदारा बरोबरच सर्व कार्डधारकच काय, आख्खे गावचं बाधीत होवु शकते ?, मग हे सत्य असताना शासन दुकानदारांच्या बाबतीत इतके उदासीन का आहेत ?, कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून सर्वत्र उपाय योजना सुरु असतानाच रेशनच्या स्वस्त धान्य दुकानांमार्फत हा रोग पसरु शकतो हे ही ध्यानात घेवून शासनाने यावर उपाय योजना केली पाहीजे, धान्य दुकानदारांसमवेत त्यांच्या कुटुंबीयांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे देखील अत्यंत गरजेचे आहे, यामुळे दुकानदारांबरोबर त्याच्या कुटूंबियांचे तथा सर्वच गोर-गरीब कार्डधारकांचे देखील आरोग्य आबाधित राहण्यास मोठी मदत होईल, याविषयी शासनस्तरावर विचार होणे देखील अत्यंत गरजेचे आहे,
मात्र तरी देखील उन,वारा,पाऊस याची जराशी देखील तमा न बाळगता अनेक अवाहनांचा सामना करत वर्षानूवर्ष बदनामीचे खापर माथ्याशी घेऊन फिरणारा रेशन दुकानदार तुटपुंज्य कमिशनवर आजच्या मितीस खरोखरच "करोना योद्धा" ठरत आहे असे म्हणने वावगे ठरुच शकणार नाही. याकरीता कोरोना काळात आपल्या जिवाची आपल्या कुटुंबाची पर्वा न करता खर्या अंतःकरणाने देशाची सेवा बजावणार्या वैद्यकीय, पोलिस, सफाई कामगार, आरटीओ, महसूल, बैंकींग, पत्रकार, (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया) वाहतूक, कॄषी, शेतकरी, सहकार, राजकीय, धर्मदाय /सामाजिक संस्था/संघटना, अत्यावश्यक सेवा पुरविणारे आदी. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा "लॉकडाऊन" संपल्यानंतर परीसरातील विविध सामाजिक संस्था / संघटनांच्या माध्यमातून "कोरोना योद्धा" म्हणून त्यांचा सन्मान/सत्कार करण्यात येणार असल्याचं काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे, मात्र यामध्ये प्रमाणिक रेशन दुकानदारांचाही समावेश व्हावा आणि त्यांनाही "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान मिळावा अशी अनेक रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांची मनस्वी इच्छा असल्याचे कानी पडत आहे, जर असे झाल्यास प्रमाणिक रेशन दुकानदारांना देखील त्यांच्या सद्कार्याच्या प्रती उचित न्याय मिळेल अन आपल्या पाठीशी कुणी तरी खंबीरपणे उभे आहे हे लाक्षात घेवुन त्यांना काम करण्यास वेगळी उर्जा मिळेल, याकरीता आमची राजकारण विरहित सर्वधर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशनच्या माध्यमातून सदरील मान्यवरांचा "करोना योद्धा" म्हणून सन्मान/सत्काराचा उपक्रम राबविण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे, 🙏
आपल्या घरातच रहा, सुरक्षित रहा !
आपल्यासह परीवाराचं हित पहा !!
शौकतभाई शेख
समता फाऊंडेशन, श्रीरामपूर
M - 9561174111 / 9226833020