shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी एक्सप्रेसचा दणका; अखेर त्या अवैध वाळुसाठा करणाऱ्या ठेकेदाराला 1 लाख 57 हजाराचा दंड

हिंगोली/प्रतिनिधी: (विश्वनाथ देशमुख)
दि.11,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सिमेंट बंधा-याचे बांधकाम चालु असतांना संबंधित ठेकेदाराने अवैधरित्या वाळुचा साठा करून ती वाळु बांधकामासाठी वापर असल्याची बातमी शिर्डी एक्सप्रेस न्युज ने प्रकाशित केली होती.या बातमीची दखल घेत नायब तहसीलदार भालेराव यांनी संबंधित बंधा-यावर येऊन जवळपास 15 ब्रास वाळुसाठा जप्त केला होता.अवैधरित्या वाळुसाठा केल्याप्रकरणी सेनगांव चे तहसीलदार जिवकुमार कांबळे यांनी त्या ठेकेदाराला 1 लाख 57 हजार 350 रूपये दंड भरण्याचे आदेश दि.09 जुन मंगळवार रोजी काढले असल्याची माहीती तहसीलदार जीवकुमार कांबळे यांनी दिली आहे.



गुगुळ पिंपरी येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधा-याच्या कामात अवैधरित्या वाळुसाठा करून ती वाळु वापरण्यात येत असल्याची बातमी शिर्डी एक्सप्रेस न्युज ने प्रकाशित केली होती.याप्रकरणी तो अवैध वाळुसाठा जप्त करून संबधीत ठेकेदाराला वाळु संदर्भात पुरावे मागितले होते.परंतु त्या ठेकेदाराकडे कोणत्याही पावत्या उपलब्ध नसल्याने हा साठा अवैधरित्या असल्याची खात्री महसूल विभागाला झाल्याने दि.09 जुन रोजी संबंधित ठेकेदाराला 1 लाख 57 हजार 350 रूपये दंड भरण्याचे आदेश नोटीशीव्दारे दिले आहे.परंतु जप्त केलेला वाळुसाठा संबंधीत ठेकेदाराने वापरल्याबद्दल कोणतीच कार्यवाही का केली नाही यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील वर्षी अशाच प्रकारे सेनगांव तालुक्यातील माहेरखेडा येथे अवैधरित्या वाळुचा साठा जप्त करून त्यावर दंड न लावता कलम 379 प्रमाणे गोरेगाव पोलीस स्टेशनला तलाठी गळाटु यांनी गुन्हा दाखल केला होता.एकाच महसुल विभागामार्फत अशाप्रकारे एकाच गुन्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या कार्यवाही कशा होतात असा प्रश्न परीसरातील सुज्ञ नागरीकांना पडला आहे.त्यामुळे महसुल विभागाने दोन्ही कार्यवाही हि एकाच पध्दतीने कराव्या अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया 
सेनगांव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सिमेंट बंधारा बांधकामाजवळ अवैधरित्या वाळुसाठा केल्याप्रकरणी संबधीत ठेकेदाराला 1 लाख 57 हजार 350 रूपये दंड भरण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

      जीवकुमार कांबळे 
तहसीलदार सेनगांव जि.हिंगोली
close