shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत दि.11 ते 16 जुन पर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

अहमदनगर, दि. 10 जून  -  जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयामार्फत  दिनांक 11 ते 16 जुन, 020 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. तरी जिल्‍हयातील सर्व उद्योजकांना आवाहन करण्‍यात येते की, त्‍यांच्‍या कामाच्‍या गरजेनुसार तात्‍काळ मनुष्‍यबळाची आवश्‍यकता आहे अशा उद्योजकांनी या मेळाव्‍यात सहभागी व्‍हावे.


जिल्‍हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार ज्‍यांनी  www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपली नांवनोंदणी केलेली नसेल अशा उमेदवारांना आवाहन करण्‍यात येते की, आपली नावनोंदणी करुन या संधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन सहायक आयुक्‍त कौशल्‍य विकास रोजगार  व उद्योजकता वि. जा. मुकणे यांनी एका पत्रकान्‍वये केले आहे.
***


close