shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निगडीतील सेक्टर २२ मध्ये ‘अर्सेनिक अल्बम-30’ टॅब्लेटस, मास्कचे वाटप व सॅनिटायझरची फवारणी करा; माजी नगरसेवक तानाजी खाडे यांची मागणी


पिंपरी-चिंचवड:
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट गंभीर होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसवर अद्यापही कोणती लस उपलब्ध नाही, त्यामुळे केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव उपाय आहे. निगडीतील सेक्टर २२ विभागात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे या विभागात ‘अर्सेनिक अल्बम-30’  टॅब्लेटस, मास्कचे मोफत वाटप व ज्या ठिकाणी पेशंट सापडले आहेत,त्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्यात यावी,अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी केली आहे.



याबाबत तानाजी खाडे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरूध्द प्रतिबंधात्मक औषध म्हणून  ‘अर्सेनिक अल्बम-30’ हे होमिओपॅथीक औषध सुचविले आहे. आता पर्यंतच्या सर्व्हेनुसार या होमिओपॅथीक औषधाचे अतिशय चांगले परिणाम कोरोना संकटप्रसंगी दिसून आले आहेत.त्यामुळे शासनाने त्याचा वापर करण्यास परवानगी दिलेली आहे. त्या अनुषंगाने निगडी,से.२२ मधील सर्व नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी व कोरोना संक्रमणापासुन सुरक्षित रहाण्यासाठी प्रभावी ठरलेल्या या होमिओपॅथी टॅब्लेटसचे वाटप करण्यात यावे,तसेच प्रत्येकाला मास्कचे मोफत वाटप व कोरोना विषाणूचा प्रभाव वाढू नये यासाठी निर्जंतुकीकरण होण्यासाठी सॅनिटायझरची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी तानाजी खाडे यांनी केली आहे.
close