shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडील महत्वाचे पदभार तात्काळ काढून घ्यावेत; नगरसेवक तुषार कामठे यांची आयुक्तांकडे मागणी


पिंपरी-चिंचवड:
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाची विभागणी करताना अत्यंत चुकीची पद्धत अवलंबण्यात आली आहे. अनेक निविदांमध्ये संशयास्पद कामकाज करणाऱ्या संतोष पाटील यांच्याकडील महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार तात्काळ काढून घेण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे. 



तुषार कामठे यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाज वाटपाबाबत संशय आणि नाराजी व्यक्त करत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, अतिरिक्त आयुक्त अजित पवार हे संतोष पाटील यांच्यापेक्षा प्रशासकीय अनुभवाने वरिष्ठ आहेत. तर संतोष पाटील हे कनिष्ठ आहेत. पाटील यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप असून त्यांनी राबविलेल्या निविदा प्रक्रिया या संशयास्पद आहेत. काही निविदांबाबत चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. असे असतानाही त्यांच्याकडे महापालिकेचे महत्त्वाचे विभाग सोपविण्यात आले आहेत, ही गंभीर बाब आहे. संतोष पाटील यांच्याकडे सोपविलेले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, स्थापत्य मुख्यालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, झोपडपट्टी निर्मूलन यासारखे तसेच इतर महत्त्वाच्या विभागाचा तात्काळ कार्यभार काढून तो अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात यावा. आपण हा निर्णय न घेतल्यास आंदोलन केले जाईल, असा इशाराही तुषार कामठे यांनी दिला आहे. महापालिकेच्या कामकाजाची विभागणी करताना चुकीची पद्धत अवलंबण्यात आली असून अनेक निविदांमध्ये संशयास्पद कामकाज होत असल्याचे आरोप होत असतानाच नगरसेवकांनी निवेदन देत महत्त्वाचे पदभार काढून घेण्याची मागणी केली आहे.
close