shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

50 लोकात लग्न समारंभ या नियमाचे कायद्यात रूपांतर करा : आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा - 
50 लोकात लग्न समारंभ या नियमाचे कायद्यात रूपांतर करा अशी विनंती देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना ई मेल द्वारे पाठविलेल्या पत्रात केले आहे.


     
ढूस यांनी पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी नको म्हणून शासनाने लग्न समारंभ करण्यासाठी मर्यादा घातल्या आहेत.  छोटेखानी विवाह झालेच पाहिजेत व असा कायदा व्हावा ही काळाची गरज बनली आहे. राज्यात दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत चालले आहे.  शेती मालाला शास्वत भाव राहिला नाही. नोकऱ्या सरकारी राहिल्या नाहीत. खाजगी नोकरीतही शाश्वती नाही. जर मुलीच्या लग्नाला 100 रु खर्च येत असेल तर मुलालाही 80 रु खर्च येतो हे वास्तव नाकारता येणार नाही. काही शेतकरी म्हणतात की, या लग्नापाई  कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरत आमच्या काही पिढ्या गेल्या आहेत. तर कित्येकांनी आत्महत्या केल्या आहेत.  त्यामुळे आता तरी सर्वांनी डोळे उघडले पाहिजेत. विवाह हा सोहळा नाही तर तो संस्कार आहे.  आपण कितीही मोठं लग्न केलं तरी लोक शेवटी विसरून जातात. शेतकरी तर या कर्जापाई शेती विकून गुंठ्यावर आलाय. त्यामुळे मोठ्या लग्नाची इर्षा व भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा थांबावी म्हणून  केवळ 50 लोकांमध्ये लग्न समारंभ उरकण्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे.
   
हा कायदा अमलात आला तर सर्वप्रथम शेतकरी सुखी होईल, कारण समाज्याच्या लाजेकाजे ऐपत नसतानाही कर्ज काढून मोठे लग्न समारंभ केले जातात. पर्यायाने  कित्येक शेतकऱ्यांच्या आत्महत्येला हे समारंभ कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे हा कायदा होणे काळाची गरज बनली आहे. व तसे झाले तर अनावश्यक लग्न खर्च कमी होईल आणि वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लागेल. तसेच मेहंदी, हळद आदी कार्यक्रमावर बंधने येतील व होणारी गर्दी टळेल. स्वागत समारंभही साधेपणाने होईल. आणि आजची बचत उद्याची निर्मिती ठरेल. त्यामुळे कोरोनाची मंदी ही सर्वांना सुधारण्यासाठी मोठी संधी ठरणार आहे म्हणून  हा कायदा होणे अत्यंत गरजेचे आहे. महोदय, केवळ 50 लोकांत लग्न समारंभ या नियमाचे कायद्यात रूपांतर झाले तर आपल्या राज्यासाठी ही खूप मोठी क्रांती ठरेल.  तसे झाले तर  लग्नाला होणारा अफाट खर्च वाचवता येईल.  व तोच खर्च पालकांना मुला मुलींच्या संसारा साठी वापरता येईल.
     
लग्न समांभासाठी होणाऱ्या खर्चावर मर्यादा घालाव्यात यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा सुरू आहे. पण त्यावर कसे बंधन आणायचे हे समजत नव्हते ते आज कोरोणाने आपली जीवनशैली बदलवून दाखवून दिले आहे.  म्हणून या बदलासाठी कायदा होणे व तो अमलात आणला जाणे अत्यंत गरजेचे आहे. तरी आपणास विनंती की, 50 लोकांमध्ये लग्न समारंभ या नियमाचे कायद्यात रुपांतर करावे आणि त्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती आप्पासाहेब ढूस यांनी मुख्मंत्र्यांकडे करून मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आमचे विनंतीस मान देवून ज्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी थुंकने दखलपात्र गुन्हा ठरवायला त्याच पद्धतीने ही विनंती मान्य करतील असा विश्वास व्यक्त केला.
close