shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगरसेवक मयूर कलाटे मित्र परिवाराच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाखांची मदत; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द..!


पिंपरी-चिंचवड:
पिंपरी - राज्यावर आलेल्या कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असून, मदतीचा ओघ सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे मित्र परिवाराच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला ५ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.



या निधीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मयूर कलाटे, गणेसन के, डॉ. प्रीतीश देशमुख उपस्थित होते. कोरोनाच्या या संकटात पहिल्या दिवसापासून मयूर कलाटे मैदानात उतरले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत गोरगरिबांना मदत तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे मोफत वाटप देखील कलाटे यांच्यावतीने करण्यात आले आहे. मयूर कलाटे मित्र परिवाराच्या माध्यमातून समाजातील विविध उपक्रमांना नेहमीच मदत केली जाते. त्यांनी आजवर समाजातील अनेक घटकांना मदतीचा हात दिला आहे.

नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ आणि प्रशासन महाराष्ट्राला ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. अजितदादांनी ज्यांना जे शक्य आहे, तशी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा दृष्टीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला ५ लाख रुपयांची मदत केली आहे.
close