shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्जमाफीत प्राप्त शेतकर्‍यांना दत्तक बँका बंधनकारक न करता ज्या बँकेंत खाते आहे त्याच बँकेतून नविन पिककर्ज द्या-शिवसेनेची मागणी


हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२२,शासनाने शेतकरी बांधवाना कर्जाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले शेतकरी योजनेअंतर्गत कर्जमाफी केली अनेक शेतकरी बांधव या योजनेत पात्र ठरुन त्यांचे कर्ज माफ झाल्याच्या याद्या आल्या आहेत. परंतु पात्र शेतकरी नविन पिककर्जासाठी आवश्यक ते कागदपत्रे घेऊन बँकेत येत आहेत मात्र अधिकारी तुमची दत्तक बँक कोणती हा प्रश्न विचारुन कर्ज नाकारत असल्याने कर्जमाफीत प्राप्त शेतकर्‍यांना दत्तक बँका बंधनकारक न करता ज्या बँकेत खाते आहे त्याच बँकेतून शेतकर्‍यांना नविन पिककर्ज देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी सेनगाव तहसिल मार्फत हिंगोली जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे आज दि.२२ जुन सोमवार रोजी केली आहे.



शासनाने शेतकरी बांधवांना कर्जाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी केली यामध्ये अनेक शेतकरी बांधव  या योजनेत पात्र ठरुन त्यांचे कर्ज माफ झाल्याच्या याद्या आल्या आहेत.आज रोजी हे पात्र शेतकरी नविन पिककर्ज काढण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन बँकेत चकरा घालत आहेत. जुन महिना संपत आला असुन पेरणीचे दिवस उलटुन जात आहेत अद्याप ही शेतकरी पिककर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.ज्या शेतकर्‍यांची खाते ज्या बँकेत आहेत त्या बँकेत सर्व कागदपत्रे घेऊन जात आहेत मात्र तेथील बँक अधिकारी तुमची दत्तक बँक कोणती हा प्रश्न विचारुन कर्ज नाकारले जात आहे. परीणामी केलेल्या कागदपत्राचा खर्च व वेळ ही वाया जात आहे दुसऱ्या बँकेत परत कागदपत्रे जमा करण्यात बराच वेळ वाया जाईल परीणामी शेतकरी बांधवाला पेरणी करण्यास बि-बियाणे घेण्यास विलंब होईल वबळीराजाचा खरीपाचा हंगाम पेरणी अभावी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी याची गंभीर दखल घेत ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षी ज्या बँकेतुन पिककर्ज घेतले त्यांना याही वर्षी त्याच बँकेने त्वरीत कर्ज वाटप करण्या संदर्भात आदेशीत करावे जेणे करुन शेतकर्‍यांचा खरीप हंगाम वाया जाणार नाही आणि कोरोना आजाराच्या पाश्वभुमीवर गर्दी ही टळता येईल व शेतकर्‍यांसह बँक कर्मचाऱ्यांचा जिव ही धोक्यात येणार नाही.या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, देविदास कुंदर्गे, चेअरमन वैभव देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे-पाटील, कवरदडीचे सरपंच दिलीपराव कुंदर्गे-पाटील आदींसह शिवसैनिकांच्या सह्या आहेत
close