shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकर्‍यांच्या विविध मागण्या तात्काळ पुर्ण करा, भाजपाची मागणी

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२२,हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकर्‍यांची होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबवावी व महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांना महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपया पर्यंत सरसगट कर्जमाफी होती ती कर्जमाफी सर्व शेतकर्‍यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी या मागणीसह विविध मागणीचे निवेदन सेनगांव तहसिलदार जीवककुमार कांबळे यांना भाजपाच्या वतीने आज दि.२२ जुन सोमवार रोजी देण्यात आले आहे.


तसेच शेतकर्‍यांना विशेष तरतुत करुन तात्काळ पिककर्ज उपलब्ध करुन द्यावेत.कोरोना या विषाणुमुळे लाँकडाऊन करण्यात आले होते त्यामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीमुळे सर्व सामान्य शेतकरी मजुरदार व छोटे व्यवसायीक यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या खात्यावर किमान दहा हजार रुपये रोख रक्कम तात्काळ देण्यात यावी यासह शेतकर्‍यांना २०२० मध्ये पिककर्ज तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे. महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पुरस्कार निधी देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती ती शेतकर्‍यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी,शेतकर्‍यांचे कापुस कवडीमोल भावाने विकले जात आहेत ते शासनाने तात्काळ खरेदी करून घ्यावे ह्या मागण्या शासनाने तात्काळ पुर्ण करुन २२ मे रोजी महाविकास आघाडी सरकारने आदेश काढला व सरकारने निधी नसल्याने शेतकर्‍यांच्या खात्यात शासन रक्कम भरु शकत नाही याची कबुली देऊन शासनाच्या नावे कर्ज मांडावे असे बँकांना सांगितले मात्र बँकेनीं या शासन निर्णयाला दाद दिली नाही. यामुळे महाराष्ट्र शासनाने वरील सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घालून शेतकर्‍यांची होत असलेली पिळवणूक थांबवावी.वरील सर्व मागण्या तात्काळ पुर्ण न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिव्र आदोंलन छेडण्यात येईल असा ही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख, भाजपाचे जेष्ठ नेते माजी पं.स.सभापती आप्पासाहेब देशमुख,तालुकाध्यक्ष अशोकराव ठेंगल,भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पंडीत तिडके,माजी कृऊबा समितीचे सभापती शंकरराव बोरुडे, सेनगांव भाजपा शहराध्यक्ष कैलासराव खाडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रीरंग राठोड, श्रीराम देशमुख, दिनकर शिराळे, विलास तिडके, सोंडु पाटील, पांडुरंग देशमुख आदीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
close