shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवीन विज कनेक्शन, सौर कृषी पंप, ट्रांसफार्मर संदर्भात शिवप्रतिष्ठाण संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.!!

संगमनेर: शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन,सौर कृषी पंप, ट्रांसफार्मर मिळण्यासाठी  येत असलेल्या अडचणींसाठी मा.उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्याकडे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 


याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन,सौर कृषी पंप, ट्रांसफार्मर मिळण्यासाठी दिवसेंदिवस अडचणी निर्माण होत आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे नाहक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाही,  सौर कृषी पंप योजना फॉर्म भरणे बंद आहे,  नवीन ट्रांसफार्मर लवकर मिळत  नाही..लाँकडाऊन असल्यामुळे शेतीमालाला एक तर बाजारपेठेत उपलब्ध होत नाही, बाजारपेठ मिळालीच तर कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागतो. सध्या शेतकरी प्रचंड मानसिक, आर्थिक तणावात वावरत असून आपण योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट थांबवावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत मा.नितीनजी राऊत (उर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.प्राजक्तजी तनपुरे (राज्यमंत्री नगर विकास ऊर्जा उच्च तंत्र शिक्षण), मा.विश्वजीत कदम (कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य), मा.जयंत पाटील  (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. तरी संबधित विभागाने मागण्या मान्य नाही झाल्यातर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवश्री. राहुल ढेंबरे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे.
close