हिंगोली/प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)
दि.२९,दुबार पेरणीमुळे व अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सेनगांव तालुक्यातील शेतक-यांचे झालेल्या नुकसान भरपाई साठी पंचनामे न करता सरसगट हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान देण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा हिंगोली जिल्हा सरचिटणीस विठ्ठल धाकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी आज दि. २९ जुन सोमवार रोजी सेनगांव तहसिलला एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
बोगस बिज उत्पादक कंपनीमुळे शेतकर्यांच्या शेतात पेरणी करुन देखील बियाणाची उगवण न झाल्याने दुबार पेरणी केली होती परंतु अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकर्यांच्या शेतामध्ये तलावजन्य परीस्थिती निर्माण होऊन काही बियाणे जाग्यावरच सडले व काही वाहून गेल्याने शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट आले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सदर नुकसानीची बाब लक्षात घेऊन सरकारने कोणत्याही पंचनाम्याची वाट न पाहता शेतकर्यांना तात्काळ सरकट हेक्टरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदन भाजपा युवा मोर्चा सेनगाव तालुक्याच्या वतीने सेनगाव तहसिलला देण्यात आले आहे. निवेदनावर हिंगोली भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल धाकतोडे,भाजपा आदिवासी विकास आघाडी तालुकाध्यक्ष गजानन घुकसे, माजी कृ.ऊ.बाजार समितीचे सदस्य हरीदास नरवाडे, भाजपा सोशल मिडिया युवा अध्यक्ष गजानन सोनुने,सरपंच बाबाराव कोटकर,शुभाष शिंदे, संतोष घुकसे, संपत सोनुने, संतोष घुगे, रुपेश मोरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

