shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी ते पंढरपूर पालखी सोहळा ज्ञानेश्वर मंदिरातच पूजन करून होणार साजरा..!!

शिर्डी ते पंढरपूर पालखी सोहळा ज्ञानेश्वर मंदिरातच पूजन करून होणार साजरा..!!
सावळीविहीर(राजकुमार गडकरी):
 देशात ,राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उपयोजना करण्याबरोबरच मंदिरेही  दर्शनासाठी भाविकांना बंद करण्यात आली होती .मात्र काही राज्यात मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली असली तरी महाराष्ट्रात मात्र सर्व मंदिरे भक्तांना दर्शनासाठी अजूनही बंद आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या श्री पांडुरंगाचे मंदिरही बंद असल्यामुळे शिर्डी ते पंढरपूर जाणारी पायी दिंडी वारी यावर्षी नेहमीप्रमाणे आज तिथीनुसार श्री साईबाबांच्या पादुका व श्री पांडुरंगाच्या पादुका आणि प्रतिमा यांचे श्री  ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट येथील महंत श्री काशीकानंद महाराज यांच्या हस्ते पूजन करून प्रथेप्रमाणे अभंग गात सोशल डिस्टंन्स पाळत व मास्क बांधून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत निमगाव येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातच ठेवण्यात आली आहेत.


      येथेच या पादुकांची आता आषाढी एकादशीपर्यंत पूजा अर्चा होणार आहे. श्री साईबाबा संस्थान,  शिर्डी व निमगाव ग्रामस्थ  व वारकरी मंडळ  व श्री ज्ञानेश्वर महाराज मंदीर ट्रस्ट ,निमगाव यांच्यावतीनेआयोजित शिर्डी ते पंढरपूर या पायी दिंडी वारीला तेरा वर्षांची परंपरा असून यावर्षी मात्र शिर्डीहून पंढरपूरला ही पायी दिंडी जाणार नाही.पंढरपूरचे मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे सर्वच दिंड्या पालख्या यावर्षी जाणार नाहीत. त्यामुळे शिर्डी ते पंढरपूर ही पालखी यावर्षी निमगाव येथे श्री ज्ञानेश्वर मंदिरात ठेवली जाणार आहे. दरवर्षी या दिवसात रस्त्याने जाणारे  शेकडो दिंड्या व हजारो वारकरी हातात टाळ, मृदुंग व खांद्यावर पताका घेत श्री विठूरायाचा जयजयकार करत पंढरपूरकडे जाताना शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी थांबत असतात. मात्र शिर्डीचे श्री साईबाबा मंदिरही भाविकांना दर्शनासाठी सध्या बंद असल्यामुळे व पंढरपूरचे मंदिरही बंद असल्यामुळे,व दिंड्या नसल्याने यावर्षी शिर्डीत भाविकही दिसून येत नाहीत. पंढरपूर प्रमाणेच शिर्डीही भक्तां विना  सध्या अगदी सुनी सुनी वाटत आहे, आता या दिंडीतील प्रत्येक वारकरी श्री पांडुरंगाला व श्री साईबाबाला आपापल्या घरातच पूजन करून प्रार्थना करून कोरोनाचे संकट लवकर राज्यातून, देशातून जाऊ दे! म्हणून मनोमन साकडे घालत आहेत.
close