shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डीजिटल शाळांची संकल्पना शेतमजूर, वंचित आणि भटक्या विमुक्तांच्या पाल्यांसाठी श्राप की वरदान..??

डीजिटल शाळांची संकल्पना शेतमजूर, वंचित आणि भटक्या विमुक्तांच्या पाल्यांसाठी श्राप की वरदान..??
दि.18/6/2020
हिंगोली प्रतीनीधी :- गजानन गिरे गोरेगावकर
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन , ई लर्निंग, डिजिटल शाळांची संकल्पना पुढे येत आहे किंबहुना काही पालकांनी आपल्या मुलांसाठी तशी सुरुवातही केली आहे परंतु जी शाळाबाह्य मुले आहेत ज्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात 100% आणणे अद्यापही शासनाला शक्य झाले नाही तिथे हे डिजिटल शिक्षणाची संकल्पना कितपत यशस्वी होईल याची शंकाच आहे.
डिजिटल शाळांचे संकल्पना मांडताना भटक्या विमुक्त, पारधी समाज, वडार समाज, रामोशी ,डोंबारी ,कचरा वेचणाऱ्या ची मुलं ,गोरगरीब मजुरांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, या डिजिटल संकल्पनेत कशी टिकतील हा मोठा यक्ष प्रश्न आहे
डिजिटल शिक्षणाचा मुद्दा हा शहर आणि निमशहरातल्या मध्यमवर्ग व नीम मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून चर्चेत आलेला मुद्दा आहे , आपण ई लर्निंग किंवा डिजिटल शिक्षणाची चर्चा करतोय पण शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचे काय ज्यांच्या पोटाचा प्रश्न तीव्र झालेला आहे त्या घरातील मुलापर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचणार कसे ?? पोट भरल्या शिवाय शिक्षणाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे शक्य आहे का ??
वंचित आणि भटक्या वर्गाचा विचार या डिजिटल शिक्षणाच्या संकल्पनेत होत नाही याची मोठी खंत आहे !
ग्रामीण भागातील गाव वस्त्यावर अध्याप मोबाइल सिग्नल पोहोचले नाही तिथे कनेक्टिविटी च्या गोंडस नावाखाली दहा दहा दिवस बँका बंद असतात स्वत: ची जमापुंजी वेळेवर मिळत नाही , जिथे बोलताना दोन-तीन वेळा फोनच्या नेटवर्कमध्ये अडथळा येतो अशा गावगाड्यात डिजिटल शिक्षण मृगजळा आसमान नाही का ??  आणि याचा विचार कोणी करायचा यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा जे पालक आपल्या मुलांना महागडी स्मार्टफोन ,लॅपटॉप घेऊन देऊ शकत नाहीत त्यांची मुलं शिक्षणापासून दूरच राहणार का यानिमित्ताने पडलेल्या मोठा यक्ष प्रश्न आहे.
close