shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वादळवारा आणि पावसाळ्याच्या पाश्वभुमीवर जनतेची गैरसोय टाळण्यासाठी सेनगांव महावितरणचे आवाहन

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.4,हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी वरूणराजाने हजेरी लावत पावसाळ्याच्या सुरूवातीचे संकेत दिले आहेत.

या सुरूवातीच्या काळात सोसाट्याचा वारा,वादळवा-यामुळे ठिकठिकाणी विद्युत तारा तुटणे,विद्युत खांब मोडणे अशा घटना घडत असतात ह्यातुन विद्युत पुरवठा खंडीत होते.त्यामुळे सर्वसामान्यांना अनंत अडचणीला सामोरे जावे लागते आणि गैरसोय होते.ही गैरसोय टाळण्यासाठी सेनगांव महावितरणला संपर्क साधत तक्रार कळवा निवारण लगेचच करू असे आवाहन महावितरणचे अभियंता एस.बी.वडगावकर यांनी केले आहे.
सेनगांव तालुक्यातील परीसरारात जिथे विद्युततारा तुटल्या किंवा लोंबकळत असतील पोल वाकला असेल किंवा पडुन विद्युत पुरवठा खंडीत झाला असेल अशा ठिकाणच्या दक्ष नागरीकांनी तात्काळ त्या-त्या क्षेत्रातील विद्युत अभियंत्याशी फोनवर माहीती देऊन विद्युत पुरवठा अखंडीत सुरू राहुन जनतेची होणारी गैरसोय टाळता येईल.33 के.व्ही उपकेंद्र घोरदरी एस.बी.वडगावकर 7875764517 यांच्याशी संपर्क साधुन अडचण कळवावी.1)पानकनेरगाव उपकेंद्र 33 केव्ही 2)सेनगांव उपकेंद्र 33 केव्ही 3)खिल्लार उपकेंद्र 33 केव्ही 4)उपकेंद्र पुसेगाव 33 केव्ही या क्षेत्रातील अडचणीच्या वेळी एन.के.मेश्राम 7875488255 यांच्या शी संपर्क करावा.1)गोरेगाव उपकेंद्र 33 केव्ही 2)आजेगाव उपकेंद्र 33 केव्ही 3)जवळा(बु) उपकेंद्र 33 केव्ही या परीसरातील अभियंते शैलेश देशमुख मो.नं.7030951814 यांच्या शी संपर्क करावा.कडोळी उपकेंद्र 33 केव्ही या क्षेत्रातील जनतेनी दिपक घुगे मो.नं. 7875465352 यांच्या शी संपर्क करावा.सेनगांव तालुक्यातील चार ही विभागातील जनतेला पावसाळ्याच्या सुरूवातीच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी व जनतेची होणारी गैरसोय टाळुन तालुकाभर अविरत अंखडीत विद्युत पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी सेनगांव महावितरणच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत या परीस्थितीत आपल्या परीसरात विद्युत पुरवठा होऊ शकतो किंवा खंडीत झाला अशावेळी आपण एक दक्ष नागरीक म्हणून आमच्या वरील उपकेंद्र वाईज अभियंत्यास तक्रार करावी लगेचच तात्काळ निवारण करू जेणेकरून जनतेला अखंडीत विद्युत सेवा देता येऊ शकेल असे आवाहन अभियंता एस.बी.वडगावकर यांनी केले आहे.
close