shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड शहराचा उद्यापर्यंतचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार..!!

पिंंपरी चिंचवड शहराचा उद्यापर्यंतचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार..!!
 पिंपरी-चिंचवड (पुणे):
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा विद्युत पुरवठा मंगळवारी आणि आज (दि.०३) खंडित झाल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील आज सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तसेच आज सायंकाळचा आणि उद्या (दि.०४) गुरुवारी सकाळचाही पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा काल आणि आज विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे त्या कालावधीत पाण्याचा उपसा झाला नाही. परिणामी, पिंपरी चिंचवड शहरातील आजचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तसेच आज संध्याकाळचा आणि उद्या सकाळचाही पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
close