shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी जवळील पिंपळे गुरवमधील काटे पुरम चौकात झाड रस्त्यावर कोसळले; रिक्षासह दुचाकीचे मोठे नुकसान..!!

पिंपळे गुरवमधील काटे पुरम चौकात झाड रस्त्यावर कोसळले; रिक्षासह दुचाकीचे मोठे नुकसान..!!

 पिंपरी-चिंचवड(पुणे) दि.३/०६/२०२०
राज्यावर सध्या निसर्ग चक्रीवादळाचे संकट आहे. कोकण आणि मुंबईला या वादळाचा जास्त धोका असला तरी त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवमधील काटे पुरम चौक परिसरात असलेले एक मोठे झाडं वादळी पावसामुळे एक रिक्षा आणि दुचाकीवर काही वेळापूर्वी रस्त्यावर कोसळले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहाणी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. 

पिंपळे गुरवमधील काटेपुरम चौकात असलेले एक झा आज सकाळच्या सुमारास कोसळले. यात एका रिक्षाचे आणि एका दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. चौकात मुख्य बस स्टॉप असल्याने नागरिकही बसची वाट पहात उभे होते. अचानक झाड कोसळल्याचा आवाज झाल्याने अनेक लोक लांब पाळल्याने मोठी जीवितहानी टाळली, या दुर्घघटनेत बसस्टॉपचे देखील मोठे नुकसान झाले आहे.शहरातील इतर भागातही अनेक ठिकाणी वादळी पावसामुळे झाडे पडल्याच्या घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
close