राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धे मध्ये येवल्याचे संतोष राऊळ राज्यात प्रथम..!!
येवला। विशेष प्रतिनिधी :
कालांश उद्योग निर्मित व रंगकला एंटरटेनमेंट प्रोडक्शन, कोपरगांव यांच्या तर्फे कोरोना लॉकडाउन काळात जनजागृतीसाठी महाराष्ट्रात राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचा विषय "लॉकडाउन" हा असून राज्यभरातून या स्पर्धांसाठी एक हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. दोन्ही स्पर्धेसाठी वया नुसार तीन गट करण्यात आले.
यात चित्रकला स्पर्धे मध्ये खुल्या गटात येवल्याचे संतोष राऊळ यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच निबंध स्पर्धेत खुल्या गटात भरत मोरे यांना प्रथम पुरस्कार मिळाला.
यातील चित्रकला स्पर्धेत पहिल्या व दुसऱ्या गटात अनुक्रमे कु. भक्ती काले व साई चासकर यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला तर निबंध स्पर्धेत अनुक्रमे कु. श्रुती क्षीरसागर व कु. कस्तुरी सोनवणे यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला.
येवल्याचे संतोष राऊळ यांनी मिळविलेल्या यशा बद्दल येवल्याचे भाग्यविधाते व लाडके आमदार तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर स्पर्धेसाठी किशोर भोसले, अतुल कोताडे व महेश मोरे हे पर्यवेक्षक म्हणून लाभले. तर रोहित काले व रोहित रावकर हे आयोजक होते.

