श्रीरामपूर- येथील गोंधवणीरोड परीसरकर गेल्या आठ दिवसांपूर्वी दुर्गंधी पासून खुप त्रस्त झाले होतो कारण कुणा महाभागांनी याठिकाणी पाटाच्या पुलाखाली साचलेल्या पाण्यात मेलेली जनावरे आणून टाकली होती, ती सडल्याने संपूर्ण परीसर दुर्गधीमय झाला होता,जणू जीव नकोशी अशी गत झाली होती, येता-जाता कचरा गाड्यावाल्यांना याबाबत सांगुनही ते ऐकत नव्हते म्हणून संबधितांना फोन करुनही सांगीतले तेही पुढे सांगतो
म्हणाले मात्र त्यांचंही कोणी ऐकेना आणि दुर्गंधीचा त्रास तर वाढतच चालला होता,अशात एक युक्ती सुचली आणि ती म्हणजे, का नाही अनुताईंच्या व्हॅटसअॅप ग्रुपवरच ही समस्या मांडावी असं ठरलं, त्यानूसार सांयकाळी अनुताईंच्या ग्रुपवर ही समस्या मांडली नी यासोबतच आपले विविध लोकप्रिय वर्तमानपत्र,वॄत्त वाहिन्या,न्यूज पोर्टलवर ही बातमी झळकली यामुळे भल्या सकाळी नगर पालिका प्रशासनाचा ताफाच सदरील ठिकाणी पोहचला,त्यात नगराध्यक्षा अनुताई, मुख्याधिकारी,आणखी संबंधित विभागाचे बरेच अधिकारी/कर्मचार्यांनी सदरील प्रकरणी तात्काळ उचित निर्णय घेत तात्काळ साफसफाई करत केवळ १२ तासाच्या आत परीसरातील त्रस्त नागरीकांच्या समस्या क्षणात दुर केल्या,याला म्हणतात सुराज्याचं दुसरं नांव म्हणजेच "अनुराज्य"
तात्पर्य -
काही इतर ठिकाणी मात्र वर्षानूवर्ष नागरी समस्यांची दखल घेतली जात नाही,आपला मनमानी कारभार चालविला जातो,केवळ नी केवळ आपला,परका असं घाणेरडं राजकारण केलं जातं,नागरी समस्यांकरीता लोकांना धरणे,आंदोलने,मोर्चे,उपोषणे करणेकामी भाग पाडले जाते,
इथं मात्र त्याविरुद्ध स्तिथी आहे, इथं केवळ एक व्हॅटसअॅप मॅसेजची इतकी तात्काळ दखल घेणं हे केवळ अनुताईंकडूनच होऊ शकतं हे आज शत:प्रतिशत सत्य झाले असल्याने परीसरातील नागरीक अनुताईंच्या या सक्षमी कार्याला मनस्वी सलाम करीत आहेत 🙏
धन्यवाद अनुताईचे आणि मुख्याधिकारी तथा समस्त नगर पालिका प्रशासनाचे
शौकत शेख -
समता फाऊंडेशन, श्रीरामपूर.

