shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोकर हे शक्तिवर्धक फळ तुम्ही कधी खाल्ले आहे का ?

भोकर  या झाडांच्या प्रत्येक भागाचा खूप वेगवेगळा हा महत्वपूर्ण उपयोग आहे. जेव्हा आपण ग्रामीण भागात रानावनात फिरत असतो तेव्हा आपण सहज सुपारीच्या आकाराचे एक फळ खातो. ते फळ जेव्हा आपण फोडतो तेव्हा फोडल्यानंतर आतून गोड चव असलेला घट्ट चिकट द्रव बाहेर येतो .हे फळ चवीला खूप उत्तम असतेच पण  यांचे  आयुर्वेदिक फायदे देखील तितकेच भारी आहेत. आदिवासी लोक भोकराच्या झाडाची पाने चवीने खातात. भोकराच्या झाडाचे लाकुडही मजबूत असते. विशेष म्हणजे भोकराचे झाडात औषधी गुण आढळतात. भोकर हे शक्तीवर्धन फळ मानले जात असल्याने आदिवासी जमाती मोठ्याप्रमाणात खातात. अनेक आजारांवरही भोकर खाल्ले जाते.



भोकर फळाला मराठीत – गोंदण, हिंदी – लासोरा; संस्कृत – श्लेष्मातक, बहुवारक; इंग्रजी – इंडियन चेरी असे म्हणतात.भोकराच्या भाजीचे औषधी गुणधर्म भोकराच्या फळांची भाजी करतात व लोणचे बनवितात.  भोकर हे फक्त मानवाचे नव्हे तर पक्षांचे देखील आवडते फळ आहे. पोपट ,मैना ,बुलबुल ,साळुंखी या सारखे अनेक पक्षी या झाडांवर फळे खाण्यासाठी येतात. पावसाळा जवळ आला की भोकरीची फळे पिकू लागतात. त्यांचा एक वेगळाच सुगंध परिसरात पसरतो त्यामुळे अनेक पक्षी झाडावर येतात . भोकर ही वनस्पती भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान या देशांत आढळते. भारतात ही वनस्पती कोरड्या पानझडी तसेच ओलसर मोसमी जंगलात सर्वत्र आढळून येते. महाराष्ट्रातही सर्वत्र आढळते. पश्‍चिम घाट, सातपुडा, कोकण सर्व ठिकाणी भोकरीचे वृक्ष नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले असतात, तर काही ठिकाणी या वृक्षाची लागवडही करतात.


भोकर खाण्याचे फायदे –   भोकरीचे फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. फळ मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ, जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे.
भोकराच्या झाडाची साल उकळून त्याचा काढा नियमित घेतल्याने गळ्याचे सर्व आजार बरे होतात. भोकराच्या झाडाची पाने वाटून त्याचा रस पिल्याने अतिसार तसेच कावीळ सारखे आजार बरे होतात. भोकराच्या झाडाची साल पाण्यात उकळून घ्यावी. पाणी कोमट झाल्यानंतर गुळण्या कराव्या. यामुळे दांत आणि हिरड्यांचे आजार बरे होतात. भोकराच्या झाडांच्या पानांचा रस अनेक आजारांवर रामबाण औषध आहे. भोकराच्या सालीचा काढा प्यायल्याने महिलांच्या मासिक पाळीच्याही समस्या दूर होतात .
 प्लिहेच्या रोगात भोकरीची फळे वापरतात. – साल – भोकरीची साल संग्राहक व पौष्टिक आहे. भोकरीची साल स्तंभक असल्याने फुफ्फुसांच्या सर्व रोगात उपयुक्त आहे. साल फांटाच्या रूपात गुळण्या करण्यासाठी वापरतात. सालीचा रस खोबरेल तेलाबरोबर आतड्याच्या व पोटाच्या दुखण्यावर उपयुक्त आहे.

भोकराच्या झाडाची सुकलेली साल आणि कापूर यांचे मिश्रण करून सुजलेल्या भागावर मालिश केल्याने सूज कमी होते. भोकरच्या झाडाची साल पाण्यात उकळावी. या पाण्याने गुळण्या केल्याने गळ्याचे आजार बरे होतात. भोकराच्या बिया बारीक करून गजकरण झालेल्या जागेवर लावल्याने त्वरीत आराम मिळतो.
 पिकलेले भोकर फळ, अडूळसा पाने व बेहडा फळे समप्रमाणात घेऊन काढा करून खोकल्यावर देतात. अतिसारावर भोकरीची साल पाण्यात उगाळून देतात. मोडशीवर भोकरीची साल हरभऱ्यांच्या आंबीत उगाळून द्यावी. भोकरीची पाने व्रण व डोकेदुखीवर उपयुक्त आहेत.

भोकरास ‘श्लेष्मान्तक’ म्हणजे कफ दूर करणारे फळ अशा अर्थाचे संस्कृत नाव आहे. जीर्णज्वर, जुलाब, लघवीची तिडीक, छातीत कफ होणे या विकारात नुसती भाजी म्हणून नव्हे तर औषधे म्हणून जरूर वापर करावा. भोकराची भाजी किंवा पिकलेली फळे खाऊन आतडय़ांना जोम येतो. वजन वाढते.
भोकराच्या फळांचे लोणचे खूप चविष्ट असून, हे राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रात अगदी प्रसिद्ध आहे. भोकराचे लोणचे अग्निवर्धक, भूक वाढविण्यास व पचनासाठी चांगले आहे. रक्तपित्तात भोकरीच्या पानांची भाजी उपयोगी आहे. 

close