काही पदार्थाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म हेच त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी साहाय्यकारी ठरत असतात.त्या वैशिष्ट्य पूर्ण गुणधर्मामुळेच संबंधित पदार्थाची ओळख ठरते. कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले कडू ते कडूच अशी म्हण अगदी शालेय जीवनापासून पाठ करत आलो आहोत व त्यामुळे आपल्या मनः पटलावर कार्ले म्हणजे कडू व कडू म्हणजे कारले हे अगदी स्पष्टपणे कोरले गेले आहे.मात्र कारले या वनस्पतीचे आपल्या शरीरासाठी किती निरनिराळ्या प्रकारे फायदे होऊ शकतात हे आज आपण पाहणार आहोत.
१) कारले ही वेलवर्गीय भाजी आहे. कारल्याचे उत्पादन हे विशेषतः मार्चमध्ये घेतले जाते. सध्या कोणत्याही भाज्या बारमाही उपलब्ध होत असल्यामुळे कारले सुद्धा वर्षभर अगदी सहजपणे उपलब्ध होते. मधुमेह सारख्या आजारांमध्ये कारले हे अधिक प्रभावी मानले जाते.
२) कारल्याच्या शरीरशुद्धी च्या गुणधर्मामुळे अनेक आजारांना शरीरातुन अगदी मुळापासून काढून टाकण्याचे काम कारले करते. कारल्याचा उपयोग हा कारल्याची भाजी, ज्यूस इत्यादी विविध प्रकारे केला जातो.
३) कारल्याच्या झाडांची पाने सुद्धा अतिशय गुणकारी मानली जातात. कारल्याच्या झाडांच्या पानांचा रस कान दुखण्याच्या समस्येवर आराम देतो. कान दुखत असेल तर कारल्याच्या झाडांच्या पानांचा रस काढून तो साधारण 4 थेंब प्रत्येक कानामध्ये टाकला असता कान दुखण्याचे थांबते.
४) कारल्याच्या वेलीच्या मुळांमध्ये सुद्धा खूप औषधी गुणधर्म असतात. शरीरावर एखादी जखम झाली असेल किंवा फोड आला असेल तर अशा ठिकाणी कारल्याच्या वेलीचे मूळ बारीक वाटून त्याचा लेप जखम किंवा फोड असलेल्या ठिकाणी लावावा आणि वरून कापडाची पट्टी बांधावी .जर कारल्याच्या वेली चे मूळ मिळत नसेल तर अशा वेळी कारल्याच्या वेलीची पाने बारीक वाटून त्याचा लेप जखम किंवा फोड आलेल्या ठिकाणी लावला तरी सुद्धा आराम मिळतो.
५) किडनीच्या समस्यांवरसुद्धा कारल्याचा रस अतिशय गुणकारी असतो. कारल्याचे उकळलेले पाणी किंवा कारल्याचा रस पिला असता किडनीचे कार्य अधिक प्रभावीपणे चालू होते व शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास ही सहाय्य मिळते.
६) ह्रदयाच्या समस्यांवर सुद्धा कारले उपायकारक ठरते. कारल्याच्या रसाचे किंवा भाजीचे सेवन केले असता शरीरातील धमन्यांमध्ये अतिरिक्त कोलेस्टेरॉल वाढण्यास मज्जाव होतो व परिणामी रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीतपणे चालून हृदयविकाराचा झटका येण्याचा संभाव्य धोका टळतो.
७) पँरालिसिस किंवा पक्षाघाताचा झटका सारख्या आजारांमध्ये कारल्याचे सेवन केल्यामुळे काही प्रमाणात फरक झाल्याचेही आढळून येते.
८) कारले टाकून उकळून घेतलेले पाणी किंवा कारल्याचा रस यांचे सेवन केले असता शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते व संसर्गजन्य रोगांना अटकाव केला जातो.
९) दमा किंवा अस्थमा यासारख्या समस्या असतील तर कारल्याच्या भाजी मध्ये अतिरिक्त मसाल्यांचा वापर टाळून या भाजीचे सेवन केले तर निश्चितच आराम मिळतो.
१०) अपचन,गँस व बद्धकोष्टता यांसारख्या समस्यांवर दीर्घकाळासाठी इलाज करायला कारल्याच्या रसाचे सेवन नियमितपणे करावे.
११) आतड्याचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी कारले हे अगदी अमृतासमान मानले जाते. नियमितपणे कारल्याचे सेवन साधारण एक ते दोन आठवडे केले असता फरक दिसून येतो. काही प्रमाणात काविळी सारख्या आजारांमध्ये ही कारल्याच्या रसाचा किंवा कारल्याच्या भाजी चा वापर उपाय म्हणून केला जातो.
१२) जलोदरसारख्या समस्यांमध्ये कारल्याचा दोन चमचे रस पाण्यामध्ये मिसळून औषधाप्रमाणे दिला जातो मात्र हा उपाय नियमितपणे केल्यास याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात.
१३) रक्त शुद्धी करणे हा कारल्याच्या रसाचा अंगभूत गुणधर्म असतो. मधुमेह असलेल्या व्यक्तीने पाव कप कारल्याच्या रसामध्ये तितक्याच प्रमाणात गाजराचा रस घेतल्यास शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखण्यास साहाय्य मिळते.
१४) कारल्यामध्ये फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते यामुळे सर्दी ,खोकला यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि पचनाशी निगडीत त्रास सुद्धा दूर होतात.भूक वाढीसाठी सुदधा कारल्याच्या रसाचे सेवन केले असता फरक दिसू लागतो.
Disclaimer : ‘शिर्डी एक्सप्रेस’च्या आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती हि प्राथमिक स्वरूपाची असून ती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय होऊ शकत नाही. यातील कोणताही उपचार किंवा सल्ला अमलात आणण्यापूर्वी सदरील विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.