shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळा चहा पिल्याने आरोग्यास होतात ‘हे फायदे…!

भारताप्रमाणेच जगभरात चहाचे चाहते खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. प्रत्येक देश आणि प्रांतामध्ये चहा बनवण्याची आणि पिण्याची पद्धत ही भिन्न असली तरी सकाळची प्रसन्न, तजेलदार सुरुवात बहुतांशी लोक चहा पिऊन करतात, कंटाळा आल्यावर किंवा एखाद्या निवांत संध्याकाळी सुद्धा चहाचीच सोबत घेतली जाते किंवा रात्री मित्र-मैत्रिणींच्या गप्पांच्या मैफलीत सुद्धा चहालाच पसंती दिली जाते. अशा या चहाविषयी कित्येकजण त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम होतात असेही सांगतात .



मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला असता त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसू लागतात. त्याचप्रमाणे तो घटक योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने आपल्या शरीरात गेला तर त्याचे शरीराला काही फायदेसुद्धा असतात. दूध घालून केलेला चहा पिण्याचे प्रमाण खूप जास्त असते तरीही काही लोक बिना दुधाचा, कोरा किंवा काळा चहा पसंत करतात. आपल्या आरोग्यासाठी काळा चहा पिणे असे अनेक फायदे आहेत  काळा चहा पिण्याचे  फायदे आज आपण पाहणार आहोतः

1) काळ्या  चहामध्ये मोठ्या प्रमाणात  अँटीआँक्सिडंट असतात. अँटीआँक्सिडंट मुळे शरीरातील पेशींना होणाऱ्या इजा रोखता येऊ शकतात ज्यामुळे काही गंभीर अशा आजारांपासून बचाव होतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॉलिफिनॉल गटातील अँटीआँक्सिडंट असतात. शरीरातील एकंदरीतच आरोग्य सुदृढ राहते. काळ्या चहातील फ्लेविनाँल अँटीअक्सिडेंट मुळे लठ्ठपणा कमी होतो. शरीरातील साखरेचे रक्तातील प्रमाण नियंत्रणात आणण्याचे कार्य काळ्या चहाद्वारे पार पाडले जाते. काळा चहा किंवा ग्रीन टी मध्ये असलेले केचीन  या अँटिऑक्सिडंटमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते मात्र यासाठी काळा चहा  सातत्याने किमान 12 आठवडे घेणे गरजेचे आहे.

2) काळ्या चहामध्ये फ्लेविनाँल हे अजून एक अत्यंत उपयुक्त असे एंटीऑक्सीडेंट असते.फ्लेविनाँल हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी आहे . हे अँटिऑक्सिडंट डार्क चॉकलेट ,काही फळे आणि भाज्यांमध्ये सुद्धा असते. याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील बँड कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी होते तसेच धमन्यांमधील रक्ताभिसरण प्रक्रिया सुद्धा अतिशय सुरळीतपणे सुरू राहते. हृदयविकाराला  कारण ठरणारे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवता येऊ शकते.शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवणे, ट्रायग्लिसराईडचे शरीरातील प्रमाण कमी करणे ,रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करणे, लठ्ठपणा दूर करून योग्य ते वजन राखणे हे सर्व आरोग्याच्या दृष्टीने चांगले निकष काळ्या चहाच्या सेवनाने साध्य केले जाऊ शकतात.

3) शरीरामध्ये चांगले कोलेस्टेरॉल आणि आणि बॅड कोलेस्टेरॉल असे दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात. बॅड कोलेस्टेरॉल अर्थातच एलडीएल हे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतात व परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते या उलट चांगले कोलेस्टेरॉल शरीरातील  बँड कोलेस्टेरॉल नाहीसे करते. काळ्या चहाच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे ही दोन्ही उद्दिष्टे सफल होतात.

4) आपल्या शरीरातील आतड्यामध्ये असलेल्या हितकारक प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी हितकारक असतात तर काही बँक्टेरिया आहे हानिकारक असतात. हितकारक बँक्टेरियामुळे शरीराला होणारे अनेक आजार दूर ठेवता येतात आणि रोगा विरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवता येते. कॅन्सर,श्वासोच्छवासाशी निगडीत आजार ,ह्रदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या समस्यांशी लढण्यासाठी शरीरातील चांगले बॅक्टेरिया मदत करतात.काळ्या चहा मध्ये असलेल्या पोलीफिनाँल मुळे आतड्या मधील चांगल्या बॅक्टेरिया यांच्या संख्येमध्ये वाढ होते  आणि हानिकारक बँक्टेरियांना रोखले जाते.

5) काळ्या चहामध्ये असलेल्या अमिनो अँसिड आणि एल-थिआनिन यांसारख्या घटकांमुळे मेंदूच्या कार्यांना चालना मिळते व ताणतणाव कमी होतो.

close