shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव येथील भाजीविक्रेता महिला झाली कोरोनामुक्त,मात्र तिच्या मुलाचा रिपोर्ट आला आज पाॅझिटिव्ह:

निमगाव येथील भाजीविक्रेता महिला झाली कोरोनामुक्त,
मात्र तिचा  मुलाचा रिपोर्ट आला आज पाॅझिटिव्
सावळीविहीर (राजकुमार गडकरी):
 शिर्डी जवळील निमगाव येथील भाजी विक्रेत्या महिलेला तीचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे आज तिला पूर्ण बरे झाल्यानंतर मोठ्या उत्साहात तिच्यावर फुले टाकत तिला दवाखान्यातुन सोडण्यात आले. मात्र तिला 14 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे 

.तसेच आज  या भाजीविक्रेता  महिलेच्या व तिच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्तींना  संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.हि भाजी विक्रेता महिला कोरोणा मुक्त झाली असली तरी व ही आनंदाची बाब असली तरी या भाजीविक्रेत्या महिलेचा मुलगा मात्र आजच सायंकाळी आलेल्या अहवालात कोरोणा बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.या भाजी भाजीविक्रेतेमहीलेचा  29 वर्षीय मुलगा हा विलगीकरण कक्षात साई आश्रम फेज टू मध्ये होता, त्याला 27 मेला विलगीकरण कक्षातठेवण्यात आले होते 
.त्यावेळी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता .मात्र त्यानंतर आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी प्रवरा येथे कोविंड१९ केअर सेंटरला पाठवण्यात आले आहे ,विशेष म्हणजे हा शिर्डी येथील साई आश्रम फेज टू विलगीकरण कक्षात असल्यामुळे त्याचा इतरांना संसर्ग होण्यापासून बचाव झाला आहे, मात्र या साई आश्रम फेस-2 विलगीकरण कक्षातील इतर लोकांची तपासणी करण्यात येत आहे, तसेच आज निमगाव येथील भाजीविक्रेता पन्नास वर्षे महिला चा रिपोर्ट निगेटिव आल्यामुळे तिला प्रवरा येथील केअर सेंटर मधून कोरोणा मुक्त झाल्यामुळे आनंदाने सोडण्यात आले .यावेळी डॉक्टर राजेंद्र विखे डॉक्टर श्रीधर गागरे यांनी व  पथकाने वैद्यकीय येथील कर्मचारी पथकाने या भाजी विक्रेत्या महिलांवर फुलांचा वर्षाव करून तिचे मोठ्या आनंदात ,तीपूर्ण मुक्त झाल्याबद्दल तिच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागतही केले .ही एकीकडे आनंदाची बाब असतानाच दुसरीकडे मात्र या भाजीविक्रेत्या महिलेच्या 29 वर्षीय मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याला पुढील उपचारासाठी  प्रवरा येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे.राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे , राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे  ,डॉक्टर राजेंद्र विखे , डॉक्टर प्रमोद मस्के  डॉक्टर संजय गायकवाड  यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वैद्यकीय पथक  प्रवरा येथील केअर सेंटर मध्ये असणाऱ्या रुग्णांवर उपचार करत आहेत , निमगाव येथील आज कोरोना बाधित रिपोर्ट आलेला हा मुलगा निमगावआगोदर येथील एका साई  निवारा आश्रम येथे कामाला होता, त्यामुळे जर कोणी या मुलाच्या पूर्वी संपर्कात कोणी आले असेल तर त्यांनी स्वतःहून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा ,कोणीही घाबरून जाऊ नये .असे आवाहन डॉक्टर श्रीधर गागरे यांनी केले आहे.
close