shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या जिवित व वित्तहानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी-आप्पासाहेब ढुस

*निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या जिवित व वित्तहानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी.*
 *- आप्पासाहेब ढुस* 

देवळाली प्रवरा - दि. 04 जुन 2020
     राज्यात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या जिवित व वित्तहानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी म्हणून देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना आज दि.4 जुन रोजी ई मेल द्वारे पत्र पाठवुन विनंती केली आहे.  
      आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री महोदयांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, 
      दि. 3 व 4 जुन रोजी आरबी समुद्राच्या दिशेने राज्यात प्रवेश केलेल्या निसर्ग चक्री वादळामुळे राज्यात बहुसंख्य भागामध्ये झाडे उन्मळून पडली आहेत, घरे कोसळली आहेत तसेच शेतातील सर्व प्रकारच्या पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. काही भागामध्ये जनावरे दगावली आहेत. राज्यात या निसर्ग चक्री वादळामुळे मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्त हानी झाली आहे. त्यामूळे एकीकडे कोरोना ने आर्थिक संकटाचा सामना करित असलेला राज्यातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य जनता दुसरीकडे निसर्ग चक्रिवादळाच्या नैसर्गिक आपत्तीने  कोलमडून पडली आहे. त्यास राज्य सरकारने तात्काळ मदतीचा हात पुढे करून पुन्हा उभे राहनेसाठी त्यांना आर्थिक मदत करने गरजेचे आहे.
      म्हणून आपणास विनंती की, निसर्ग चक्रिवादळाच्या नैसर्गिक आपत्तीने  राज्यात झालेल्या जिवित व वित्तहानिसह घरे व शेती पिकांचे आणि जनावरांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी बांधवांना तात्काळ सर्वतोपरी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व कृषी विभागासह संबंधीत विभागास योग्य ते आदेश द्यावेत असी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री महोदयांना केली आहे. 
close