shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव ते रिसोड रोडवरील राजहंस हाँटेल वरील वेटरची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२३,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरापासून जवळच सेनगांव ते रिसोड रोडवरील सुकळी (खु) फाट्यावर असलेल्या राजहंस हाँटेल वरील वेटरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२३ जुन मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.


सेनगांव तालुक्यातील मकोडी येथील युवक शिवाजी सखाराम काचगुंडे (२८) अनेक महिन्यांपासून सेनगांव ते रिसोड रोडवरील सुकळी (खु)  फाट्यावर असलेल्या राजहंस हाँटेलवर वेटर म्हणून काम करीत होता. तो हाँटेलवरच रात्री झोपत होता मात्र आज सकाळी ९ च्या सुमारास गोपाल कैलासराव तिडके रा.सेनगांव हाँटेल उघडण्यासाठी गेला असता मयत शिवाजी सखाराम काचगुंडे हा फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. लगेच गोपाल तिडके याने सेनगांव पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. हि घटना समजताच पोलीस उपनिरीक्षक बी. आर. जाधव,पो.हे.नाईक व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी सेनगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वरील घटनेप्रकरणी सेनगांव पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली आहे. मयत शिवाजी काचगुंडे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप ही स्पष्ट झाले नाही. मयताच्या पश्चात पत्नी एक पाच वर्षीय मुलगा आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी. आर. जाधव हे करीत आहेत.
close