shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोगस बियाणे विक्री करणार्‍यांची व संबधीत कंपनीची चौकशी करुन शेतकर्‍यांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२३,शेतकर्‍यांनी महागा मोलाचे व नामांकीत कंपनीचे सोयाबीन,तुर,मुग आदी बियाणे खरेदी करुन पेरणी केली मात्र ती बियाणी उगवलीच नाहीत यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान झाले आहे. संबधीत बियाणे विक्री करणार्‍यांची व कंपनीची चौकशी करुन शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या मागणीचे निवेदन दि.२३ जुन मंगळवार रोजी कृषी पदविधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने सेनगांव तहसिलदार जिवककुमार कांबळे यांना देण्यात आले.
संपुर्ण मराठवाड्यात जुनच्या पहील्याच आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली. महागामोलाचे  सोयाबीन,तुर,मुगाचे नामाकींत कंपनीचे बियाणे खरेदी करुन पेरणी ही कसली मात्र पेरणी केलेली बियाणे उगवलीच नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत.


यामुळे शेतकर्‍यांची मोठी हानी व फसवणूक झाली असल्याचे दिसुन येते त्यामुळे संबधीत बोगस बियाणे विक्री करणार्‍यांची व  कंपनीची सखोल चौकशी करुन तात्काळ शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत अशी मागणी कृषी पदविधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. या निवेदनावर हिंगोली जिल्हा विद्यार्थी सेल अध्यक्ष, कृषी पदविधर युवाशक्ती संघटना जिल्हाध्यक्ष शिवाजी पतंगे, जिल्हा संघटक ऋषीकेश देशमुख, प्रविण पोपळघट, राम झाडे, कृष्णा देशमुख, पांडुरंग गिरी, ऊध्दव हराळे,भारत खेलबाडे, गुलाब इंगळे, हर्षल जाधव आदीच्या सह्या आहेत.
close