नवी दिल्ली – ‘व्हाट्सएप’ या अॅपची अनेक फीचर्स गायब झाल्याची तक्रार भारतातले युजर्स करत आहेत. तर जगातल्या इतर काही देशांमध्येही या अॅपची फीचर्स गायब झाली आहेत. लास्ट सीन (Last Seen), ऑनलाईन स्टेटस (Online Status) ही फीचर्स काम करत नसल्याचे बहुतांश लोकांचे म्हणणे आहे. अनेक युजर्सना प्रायव्हसी सेटिंग्जचाही इश्यू येतो आहे.
युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि युरोपसह भारतात व्हाट्सएप युजर्सना काही समस्या जाणवत आहेत. लास्ट सीन हे फीचर आपोआप बंद झाले आहे. त्यानंतर ते सुरु न होणं ही समस्या जाणवते आहे. ऑनलाइन आहोत हे दाखवणंही बंद झाले आहे तर मेसेज टायपिंग करतो आहोत हे फीचरही बंद झाले आहे. नेमके हे होण्यामागचे कारण काय हे समजू शकलेले नाही. मात्र अनेक युजर्सना ही समस्या भेडसावते आहे. व्हाट्सएप चे काही फीचर्स का बंद झाले आहेत याचे कोणतंही ठोस उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही.