रायगड-मुरूड-प्रतिनिधी : (विकास मेहेतर)
मुरूड तालुक्यात आज (३०जुलै) कोरोनाचा एक नवा रुग्ण आढळून आला आहे . मांडला येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून तालुक्यात बधितांची संख्या 143 झाली आहे .
आज मांडला येथील 46 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली आहे, तर दिवसभरात 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे . महालुंगे येथील 65 वर्षीय वृद्ध , मुरूड कोळीवाडा येथील 74 वर्षीय वृद्ध , आणि नांदगाव येथील 45 वर्षीय महिला कोरोना मुक्त झाल्याने , या तिघांची रुग्णालयातून सुट्टी झाली आहे.
दरम्यान, आज अखेर मुरूड तालुक्यातील बाधित रुग्णांचा आकडा 143 वर गेला आहे . या पैकी 10 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून , 90 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे . सद्यस्थितीत तालुक्यातील 43 पॉझीटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुरूड तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे .

