चाकूर : (संजय माखणे):
मागील दोन आठवड्यात चाकूर मध्ये 3 रुग्ण सापडले असता प्रशासनाने मोलाचे कार्य करून चाकूर कोरोना मुक्त केलं न केले तोच काल दिनांक 29/7/20 ला चाकूर नगरीचे उपनगराध्यक्ष यांना स्वतः मध्ये सिंट्म्स असल्याचे जाणवले त्यांनी स्वतः कोरोना सेंटर वर जाऊन स्वतःची रॅपिड टेस्ट करून घेतली,
त्यात त्यांना पीजिटिव्ह कळवले व लगेच स्वेप घेऊन लातूर येथे पाठवण्यात आले मात्र बातमी लिहिस्तोवर त्यांचा रिपोर्ट आलेला नाही मात्र अँटीजेटीन टेस्ट च्या आधारे डॉक्टर च्या निगराणी खाली उपचार चालू आहेत तसेच आज घेतलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये 2 रुग्ण आढळून आले अशी एकूण पुन्हा 3 रुग्ण चाकूर शहरात झाले असून प्रशासना समोर पुन्हा एकदा आव्हान उभे आहे.चाकूर तीन चा फेरा चुकविणार का ? असा प्रश्न चाकूरकरांसमोर उभा ठाकला आहे..

