shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेरात आठ दिवसात नऊ कारवाया, 42 जणावरे, दोनशे किलो मांस, 24 लाख 31 हजारांचा मुद्देमाल आणि 12 जणांवर गुन्हे!

संगमनेर / प्रतिनिधी :
देशात जेव्हा पुर्णपणे स्थिरावला होता. तेव्हा देखील संगमनेरातील दस नंबरी मटन राज्यातील बड्या शहरांना पोहचविले जात होते. कोणी फळांच्या गाड्यांना परवानेे घेऊन मांस भरले तर कोणी पालेभाज्यांच्या नावाखाली मयनाची आयात निर्यात केली. म्हणजे जीवेपेक्षा हे खाणे किती प्रिय आहे.



हे लक्षात येते. त्यामुळेच तर एकडचा कोरोना तिकडे आणि तिकडचा इकडे हे देखील येथे पहायला मिळाले. आता तुमच्या समोर एक धक्कादायक माहिती येते की, गेल्या आठवडाभरात  संगमनेर, अकोले येथे कत्तलखाण्याच जाणार्‍या जणावरांबाबात नऊ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात 42 जणावरांना पोलिसांनी जीवनदान दिले असून या कारवाईत 24 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 5 लाख रुपयांचे मांस जप्त करण्यात आले असून सर्व गुन्ह्यात 12 जणांना आरोपी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात संगमनेर शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर लोणी व अकोले येथे प्रत्येकी एक गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे
close