shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा कार्यक्रम संपन्न..!!

ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा कार्यक्रम संपन्न..!!

बदलापूर (जाफर वणू):

ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख ह्यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली बदलापूर शहरातील नगरपालिका दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत शहरी बेघर निवारा केंद्र येथील गोरगरीब लोकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय वस्तू, मास्क, सॅनिटांयझर, फळ, बिस्कीट तसेच इतर वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी तेथील लोकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख  युवक जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, सेवादल शहराध्यक्ष हेमंत यशवंतराव, शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, जिल्हा महिला सदस्य सौ. अनिसा खान, लक्ष्मणराव फुलवरे, क्रांती पष्ठे, सायली  बलिद, सतीश तायडे, सुशीलकुमार देशमुख, सुधीर जाधव, ज्योती वैद्य, विध्या बैसाणे ह्यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते
close