shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबरनाथ शहरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज "आयुष काढयाचे" वाटप..!!

अंबरनाथ शहरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज "आयुष काढयाचे" वाटप..!!

अंबरनाथ (प्रतिनिधी):

अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यसम्राट माजी नगराध्यक्ष सौ. मनीषा वाळेकर, युवासेना उपजिल्हाधिकारी निखील वाळेकर तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर ह्यांच्यावतीने "विनामूल्य आयुर्वेद आयुष काढा" नागरिकांना वाटप करून या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली. सदर वेळेस या "आयुष काढा" वाटपात लोकांनी चगल्याप्रकारे लाभ घेतला.

राज्यात नव्हेतर देशभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोना व्हायरससारख्या रोगावर आळा घालण्याकरीता शासनाने लॉकडाउनचा मार्ग निवडला. परंतु अंबरनाथ शहरात कोरोना बांधितांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. त्याकरीता नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी स्वखर्चाने विविध औषोधोपयोगी वस्तूंपासून "आयुष काढ़ा" बनवून शहरातील विविध ठिकाणी वाटप करण्याची संकल्पना शिवसेना शहरप्रमुख अरविंद वालेकर ह्यांनी सूचवली असल्याने त्याला माजी नगराध्यक्षा मनीषा वालेकर ह्यांनी पूर्णरूप दिले. 

तसेच मनीषा वालेकर यांनी आपल्या राहत्या घरी लवंग, वेलची, दालचिनी, तुळस,गुळ, अद्रक आदी वस्तुंपासून "आयुष काढ़ा" तयार केला. तसेच शिवसैनिक प्रकाश डावरे, संजय गावड़े आदींच्या माध्यमातून तो काढ़ा सर्वात प्रथम मंगळवारी खुंटवली भवानी चौकात तसेच दुसऱ्या दिवशी गावदेवी चौकात नागरिकांना वाटप करण्यात आला. त्याच बरोबर यापुढे दररोज असा काढ़ा अंबरनाथ शहरातील विविध परिसरात वाटप  करणार असल्याची माहिती मनीषा वालेकर ह्यांनी दिली.
close