shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कारगिल युध्द .... माझी एक आठवण..!!

कारगिल युध्द माझी एक आठवण..!!

आदरणीय , 
भारतीय जनता आणि माझे हितचिंतक मित्र आणि आप्तेष्ट , आज दिनांक 26/7/2020 वार रविवार सकाळी झोपेतून उठल्यावर नेहमी प्रमाणे मोबाइल हातात घेउन पाहिले असता SBI बँकेचा sms आलेला होता . पेंशन रक्कम जमा झालेबद्दल . तेव्हा आपण आर्मी मध्ये होतो याची तीव्र जाणीव झाली . आणि दुसरा sms " Happy birthday " माझा एक मित्र ( माजी सैनिक ) याचे कडून.कारगिल लढाईत आमचा पुनर्जन्म झाला होता , 26 / 7 ला दरवर्षी एकमेकांना शुभेच्छा देत असतात . काही काळ फक्त sms पाहत राहिलो .21वर्षं पाठीमागे गेलो विचारात मग्न होऊन थेट कारगिल युद्ध भूमीवर आपले सवंगड्या सोबत 1999 सालीचे कारगिल युद्धाचे विदारक क्षण आठवले, तो कुटुंबा पासून दूर होत असल्याचा वियोग, त्याग , ते देश प्रेम , सैनिकांचे मनोबल आणि आपसात असलेले कॉम्बिनेशन आठवले , सिनेमा पाहताना दृश्य , संवाद पडद्यावर जसे ठराविक वेळेत नजरे समोरून निघून जातात तश्या आठवणी हृदयाच्या दृष्टी पटला वरून निघून जात होते , खरच 1999 साली झालेल्या कारगिल लढाई मध्ये शाहिद झालेल्या सर्व माझे सैनिक अधिकारी आणि कर्मचारी याना मानाचा मुजरा आणि विजय दिवस निमित्त भाव पूर्ण श्रद्धांजली ..

 मी स्वतः कारगिल लढाई मध्ये 70 इन्फ ट्री ब्रिगेड सिग्नल कंपनी  या युनिट मधून सक्रिय भाग घेतला. तसेच 1/11 Gorkha regiment  या बटालियन सोबत कारगिल युद्धात मला देश सेवा करण्याची संधी मिळाली होती , लढाई दरम्यान  पाकिस्थान सीमेवरील खालशी , दाह , घणासक ,यालदोर batalic सेक्टर , बोल्डर्स एरिया , अश्या दुर्गम ठिकाणी captain अमोल कालिया , कॅप्टन मनोज पांडे अश्या निधडया छातीच्या शेर दिल परमवीर चक्र विजेते देशप्रेमी तडफदार तरुण अधिकारी यांचे सोबत खांद्याला खांदा देऊन लढाई करण्याचा योग मला मिळाला , तसेच परमवीर चक्र विजेते फक्त  24 वर्ष वयाचे कॅप्टन मनोज पांडे युद्धात धारातीर्थी पडल्यावर यांचे पार्थिव शरीराला बॉम्ब वर्षाव होत असताना  युद्ध भूमीतून बेस कॅम्प कडे ,जेथे हेलिपॅड बनवले होते.

 त्या सुरक्षित स्थळी पोहोचवतांना खांद्यावर घेऊन जाण्याचा  सन्मान मला मिलाला आहे मी धन्य झालो होतो. समुद्र सपाटी पासून 18000 फूट उंचीवर  मे महिन्यात ही बर्फ असलेल्या प्रदेशात अनुकूल परिस्तिथी मध्ये जीवाची पर्वा न करता , घरची परस्थिती हालाक्याची असून सुद्धा त्यांची फिकीर न करता भारत मातेची शान राखन्या साठी जीवाची पर्वा न करता लढाईत प्राण झोकून दिले , त्याचे परिणाम आज देशभरात आनंदोत्सव साजरा करताना दिसतात . ते दिवस आठवल्यावर मन गहिवरून येते,युद्धात बरेच साथीदार शाहिद झाले त्यांना मनापासून 🙏श्रद्धांजली🙏.अश्या त्या अशांत परिस्थिती मध्ये ही माझ्या जवळच्या कॅमेरात काही सुंदर , हळवी आणी विदारक क्षणचित्रं मी माझ्या फोटोग्राफीच्या शौक मुळे कॅमेऱ्यात कैद केले होते. 

आजतागायत ... आज मन भरून आले शूर सैनिकांची आठवण आली , लढाईत सोबत असलेल्या सर्व माझे सर्व्हिस मध्ये असलेली तसेच निवृत्त झालेल्या जिवलग मित्र आणि अधिकारी वर्ग यांना अभिवादन आणि  सॅल्युट🚩🚩

 बजरंग चौगुल:.सहाय्यक पोलीस निरीक्षक , 
नाशिक ग्रामीण ( माजी सैनिक ,करमाळा )
close