सीबीएससी पॅटर्नच्या इयत्ता पहिली ते बारावी पाठ्यक्रमातील अभ्यासक्रम २५ टक्केने कमी करण्यात आल्याचे परिपत्रक जारी..!!
सावळीविहीर( प्रतिनिधी):
राज्यामध्ये सध्या कोरोना मोठी संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दरवर्षाप्रमाणे या वर्षी जूनमध्ये शाळा सुरू करता आल्या नाहीत.त्यामुळे दरवर्षाप्रमाणे असणारा सीबीएससी पॅटर्नच्या इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या वर्गातील पाठ्यक्रमातील अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला असल्याचे शासनाने परिपत्रक काढले असून सीबीएससी पॅटर्नच्या शाळांनाहि ते पाठवण्यात आलेआहे.
महाराष्ट्रामध्ये दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष जून मध्ये सुरु होते. सर्व शाळा जूनमध्ये सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू होतो, वर्षभरात हा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो.मात्र सध्या कोरोणाच्या संकटामुळे सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षा मध्ये राज्यामध्ये शाळा सुरू करताआल्या नाहीत.त्यामुळे पूर्ण अभ्यासक्रम शाळा जेव्हा सुरू होतील.त्यानंतर तो पूर्ण करणे अशक्य असल्याने व तसे विविध शैक्षणिक संस्थांनी शासनाला कळवल्यामुळे शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढून सीबीएससी पॅटर्न च्या सर्व पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांमधील 25% पाठ्य पुस्तकातील अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे.तसे सर्व सीबीएससी पॅटर्न असणाऱ्या शाळांना कळविण्यात आले असून कोणता अभ्यासक्रम 25 टक्के कमी केला याची माहिती शाळांना देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या वर्षी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ही शैक्षणिक ताण थोडा कमी झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांमधून ह्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

