हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.३०,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील भानेश्वर विद्यालय शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून पत्रकार जगन्नाथ पुरी यांची मुलगी कू. विजया जगन्नाथ पुरी हिने ९२.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवीला आहे.
येथील भानेश्वर विद्यालयातील दहावी वर्गातील १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. या विद्यालयातून पत्रकार जगन्नाथ यांची मुलगी कू. विजया जगन्नाथ पुरी या विद्यार्थिनीने ९२.२० टक्के गुण मिळविले तसेच आरती दशरथ देशमुख या विद्यार्थिनीने ९२.२० टक्के गुण मिळविले असून विजया व आरती या दोन्ही विद्यार्थीनींनी विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांक दिपाली शंकर गिते हिने ९०.६० टक्के व आरती लिंबाजी हरणे ९०.२० टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला आहे एकूण विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्यासह ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष ओमप्रकाश कोटकर पाटील, मुख्याध्यापक प्रदीप बुद्रुक व संस्थेचे सर्व संचालक, शिक्षकांनी व शिक्षकेत्तर यांनी कौतुक केले आहे.