हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२९,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथे हिंगोली जि.प.च्या माजी अध्यक्षाचा मुलगा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असुन राजकीय वजन वापरुन गेल्या अनेक वर्षांपासून सेनगांव शहरासह तालुक्यात अवैध गुटख्याचा धंदा करीत असून आज दि.२९ जुलै गुरुवार रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने धाड टाकत तब्बल ११ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सेनगांव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून एक राजकीय पदाधिकारी आपले वजन वापरुन शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. भंडारवार साहेब यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक पोटे साहेब,नखाते साहेब, जमादार विलास सोनवणे, बालाजी बोके, ज्ञानेश्वर सावळे, दिपक पाटील,प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने सेनगांव शहरात धडक कारवाई करीत समता नगरमधील मधील सतिश कुंडलीकराव खाडे यांच्या टिनपत्राच्या शेडमध्ये नजर, गोवा, आर जे नावाचा गुटखा हा आरोपी सतिश खाडे,दिग्विजय खाडे व सुरेश राजपाल मुंडे यांनी संगणमत करुन चोरटी विक्री करणाच्या उद्देशाने गुटख्याचा साठा करुन ठेवला तसेच बोलेरो पिकअप आर.टी.ओ.पासींग एम.एच.३८ एबी २१५१ मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला नजर नावाचा गुटखा पांढ-या रंगाच्या नाँयलाँन च्या ३२ पोते व १ फाटलेले पांढ-या रंगाच्या पोत्यामध्ये ४४ पुडे असा एकुण ५ लाख २० हजार रुपयाचा व बोलेरो पीकअप ज्याची किंमत ६ लाख रुपये असा एकुण ११ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे साहेब यांच्या फिर्यादीवरून आरोपी सतिश कुंडलीकराव खाडे, दिग्विजय सतीश खाडे व सुरेश राजपाल मुंडे रा. समतानगर यांच्यावर गु.रं.नं.२६३/२०२० नुसार कलम ३२८,१८८,२४२,२७३ व ३४ भादवि नुसार सेनगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.दिलीप नाईक हे करीत आहेत.