खर्डा । प्रतिनिधी :
खर्डा येथे सोनेगाव चौकात विनाकारण पायी रस्त्याने चालताना व स्वतःच्या तोंडाला मास्क न लावता गावात फिरताना दिसल्यामुळे तीन जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
भारतीय साथरोग अधी कलमा अंतर्गत मोसिन मुसा तांबोळी, हनुमंत महादेव सुरवसे दोघे राहणार खर्डा व आप्पा सोपान भोसले रा. सातेफळ यांना खर्डा गावात सोनेगाव चौक येथे आपत्ती व्यवस्थापन कायदा कोरोनाविषाणू covid-19 प्रादुर्भाव रोखण्याच्या तरतुदीनुसार उपाययोजना करण्याबाबत आदेशित केले असताना वरील ठिकाणी यातील आरोपी विनाकारण घराचे बाहेर येऊन कोरोणा विषाणू रोगाचे प्रादुर्भाव करिता कारणीभूत होऊ नये या नियमांचे उल्लंघन करून विनाकारण पायी रस्त्याने चालताना व स्वतःचे तोंडाला मास्क न लावता खर्डा गावात फिरताना दिसल्यामुळे. तसेच माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आले. यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात नियम काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी जामखेड पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नवनाथ भिताडे, पोलिस काँ. मनोज साखरे, विजयकुमार कोळी यांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली.

