shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न!शहर व परिसरातील शिवमंदिरातही भाविकांची सामसुम..!!

शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न..!!
शहर व  परिसरातील शिवमंदिरातही भाविकांची सामसुम..!!

सावळिविहीर( प्रतिनिधी):
आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात आज श्रावणाच्या पहिल्या सोमवार निमित्त श्री साईबाबा संस्थानच्या वतीने विविध विधिवत धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने श्री साईबाबांच्या समाधीसमोर श्री भोले महादेवांचाही  फोटो ठेवण्यात आला होता. श्री महादेवांच्या फोटोला पुष्पहार व बेलाच्या पानांचा हार घालण्यात येऊन श्री साईबाबा समाधीच्या वरती  तसेच श्री साईबाबांच्या मूर्तीला  बेलांच्या पानांचा हार, पुष्पहार तसेच रुद्राक्षाची माळ घालण्यात आली होती व श्री साईबाबा संस्थानच्या वतीने पुजारी यांनी श्री शिव स्तोत्राचे वाचन केले.श्री शिव भोलेनाथला व श्री साईबाबांना नैवेद्य ठेवण्यात आला. श्री साईबाबांना आज श्रावणी सोमवार निमित्त मुकुट व इतर अलंकार परिधान करण्यात आले होते.
 श्रावणी सोमवार निमित्त श्री साई बाबांच्या दर्शनासाठी साई भक्त मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात. श्री गुरुस्थान मंदिरातही शिवलिंग आहे, येथेही पुजाऱ्यांनी पूजा केली.मात्र कोरोनामुळे या वर्षी भाविकांना दर्शनासाठी श्री साईबाबा मंदिर 17 मार्च दुपारी तीन वाजेपासुन बंद आहे. त्यामुळे साईभक्त, शिवभक्त आज श्री साईबाबांच्या मंदिर परिसरात दर्शनासाठी दिसत नव्हते. आज फक्त पुजारी यांनी येथे श्रावणाच्या पहिल्या सोमवार निमित्त पूजा केली व तसेच पहाटे काकड आरती, दुपारी मध्यान आरती व आज श्रावणी सोमवार असल्यामुळे सु्र्योस्ताला होणारी धुपारती आज मात्र सहा वाजता करण्यात आली व दर श्रावणी सोमवारी श्रीसाईबाबांची आरती ही सायंकाळी सहा वाजता होणार आहे, तसेच रात्री शेजारती होणार आहे, अशी माहिती संस्थांकडून देण्यात आली.
येथे नित्यनेमाच्या आरत्या ,पुजा व विविध धार्मिक कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाले, तसेच शिर्डी व परिसरातील  शिव मंदिरात कोरोनामुळे दर्शनासाठी गर्दी दिसत नव्हती. स्थानिक पुजारी व भाविक दर्शन घेताना आपआपल्या परिसरातील शिवमंदिरात अटी व शर्ती पाळत दर्शन घेत होताना दिसत होते. दरवर्षी श्रावणी सोमवार निमित्त शिर्डी येथील साईमंदिरापरिसरा जवळील शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, मात्र यावेळी गर्दी अजिबात नव्हती, त्याप्रमाणे शिर्डी परिसरातील श्री पंचकेश्वर, श्री संत जनार्दन स्वामी आश्रमातील श्री काशी विश्वेश्वर, पुणतांबा येथील शिव मंदिर व विविध गावात असणाऱ्या शिवमंदिरात दरवर्षाप्रमाणे यावेळी मात्र श्रावणी सोमवार निमित्त कोठेही भाविकांची मोठी गर्दी दिसत नव्हती.  निझर्नेश्वर येथेही दरवर्षी मोठी गर्दी असते, मात्र या वर्षी येथेही  गर्दी नव्हती कोरोना मुळे शिवभक्तांनी आपापल्या घरात राहूनच व श्रावणी सोमवारचा उपवास धरून मनोभावे पूजा, अर्चा करत श्रावणी सोमवार मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. कोरोनामुळे कुठेही श्री महादेवाच्या मंदिरात शिवभक्तांची महिलांची  गर्दी दिसत नव्हती. श्रावणी सोमवारी पहिल्यांदाच सामसूम व शांततेचे  चित्र श्री शिवमंदिरात दिसून येत होते.
close