shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येवला मुख्याधिकारी विरोधात च्या गुन्ह्यचा नव्याने तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश...!!

येवला मुख्याधिकारी विरोधात च्या गुन्ह्यचा नव्याने तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश...!!

येवला। प्रतिनिधी: येवला येथील नगर परिषेदेच्या मुख्यअधिकारी यांच्या विरोधातील अट्रोसिटी गुन्ह्यचा नव्याने तपास करण्याचे आदेश निफाड़ सत्र न्यायालयाने मनमाडच्या पोलिस उपधीक्षकांना दिले. नगर परिषेदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरिकर यांच्या विरोधात अर्जुन जावळे यांनी 4 डिसेम्बर 2018 रोजी अट्रोसिटीची फिर्याद दिली होती. 

त्या नुसार गुन्हा दाखल होऊन तत्कालीन पोलिस उपाधीक्षक तथा तपासी अधिकारी रागसुधा आर. यांनी चौकशी केली होती. त्यांनी या फिर्यादित तथ्य नसल्याचा अहवाल दिला होता. मात्र,दोन्ही बाजुचा युक्तिवाद व    सीसीटीवीचे फुटेजचे अवलोकन करुन न्यायालयने हा अहवाल फेटाळला.न्यायालयाने यात अनेक त्रुटिवर प्रकाश टाकत पुन्हा नव्याने तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.अशी माहीती मनोहर जावळे (माझी नगरसेवक,येवला नगर परिषद) यांनी शिर्डी एक्सप्रेस ला दिली .
close