राजगुरूनगर । प्रतिनिधी(विद्याधर साळवे) :
खेड तालुक्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 42 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची एकूण संख्या 1017 झाली आहे अशी माहिती खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात करोना बाधित व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढतच असून तालुक्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कामगार वर्गामुळे करोना संक्रमण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे खेड तालुक्यात मागील 24 तासात चाकण 11 आळंदी 0 राजगुरुनगर 9 अशा तीन नगर परिषदांनी मिळून 20 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत तर तालुक्यातील 10 गावांमध्ये एकूण 22 व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
खेड तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 1017 आज पर्यंत तालुक्यातील एकूण मृत्यू संख्या 18
डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 556 ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 443 गेल्या चोवीस तासातील एकूण रुग्ण संख्या 42.

