लॉकडाऊन च्या काळात साई आश्रया परिवाराने वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबविले..!!
शिर्डी । प्रतिनिधी :
कोरणा सारख्या महामारी मुळे संपूर्ण जग संकटात आहे त्यामुळे सर्व ठिकाणी lockdown केले आहे. या परिस्थितीमध्ये साई आश्रया परिवाराने वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबविले आहेत.
नारळाच्या पानापासून झाडू बनविला आणि छोट्या-मोठ्या टाकाऊ वस्तु पासून शोभेच्या वस्तू बनविण्यात आल्या.जुन्या फाटक्या कपड्या पासून रजई तयार केली, त्याचप्रमाणे साईआश्रया परिसरातील भिंतीवर corona विषयी जनजागृती करणारी सोशल मेसेज देणारी पेंटिंग काढण्यात आली
अशाप्रकारे साई आश्रया परिवाराने उपक्रम राबविले आहेत,यामुळे साई आश्रयाचे परिसरातून कौतुक होत आहे.

