shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वीस गुंठेवारीच्या आतील खरेदीखत होण्यासाठी महसूल मंत्री ना.थोरातांनी प्रयत्न करावा-- मागणी..!!

वीस गुंठेवारीच्या आतील खरेदीखत होण्यासाठी महसूल मंत्री ना.थोरातांनी प्रयत्न करावा-- मागणी..!!
सावळीविहीर( राजकुमार गडकरी):
 राहता तालुक्यातील गुंठेवारी खरेदी खत दुय्यम निबंधकांकडे होत नाही, त्यासाठी कमीत कमी वीस गुंठे खरेदी हवी असते ,मात्र शिर्डी, राहता व परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून घरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथे गुंठेवारी खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, मात्र या 1,2,5,अश्या गुंठ्यांची खरेदी दुय्यम निबंधकाकडे  होत नाही, त्यामुळे सर्वांना नोटरी वर अवलंबून रहावे लागते,मात्र त्यामुळे खरेदी केलेली गुंठेवारी जागा ही  अकृषक होत नाही व त्यामुळे या गुंठे वारी मालकाला कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा किंवा बँकेकडून कर्ज मिळत नाही, तरी राहता तालुक्यातील अशा गावांमध्ये 20 गुंठे ऐवजी एक गुंठे नंतर ती खरेदी सबरजिस्टरयांचेकडे करण्यात यावी, त्यामुळे शासनाच्या महसूलामध्येही वाढ होईल, त्यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी मागणी महसूल मंत्री ना, बाळासाहेब थोरात यांच्याकडे परिसरातील नागरिकांकडुन करण्यात आली आहे. बाळासाहेब नामदार बाळासाहेब थोरात यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की ,राहता तालुक्यातील शिर्डी व राहता परिसरातील सावळीविहीर बुद्रुक सावळीविहीर खुर्द, निमगाव, निघोज, नांदुर्खी, डोराळे ,कोराळे, लोणी, पिंपळवाडी ,एकुरखे, बाभळेश्वर, आदीसह परिसरातील गावात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे.

त्यामुळे येथे घरांची संख्या मोठ्या प्रमाणात होत आहे, या परिसरात लोक घरासाठी जागा घेतानाहि मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.मात्र सध्या 20 गुंठे जागा खरेदी केली तरच सबरजिस्टर येथे नोंदणी किंवा खरेदीखत होते.मात्र या परिसरात लोक एक गुंठा, दोन गुंठे, 3 किंवा5 गुंठे अशी खरेदी करतात ,त्यांची नोंदणी किंवा खरेदीखत सबरजिस्टर  यांच्याकडे होत नाही.त्यामुळे नोटरी करूनच समाधान मानावे लागते ,मात्र त्यामुळे कोणत्याही बँकेचे लोन या जागेवर किंवा कोणत्याही शासकीय योजना त्यामुळे मिळत नाही.तेव्हा गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न  महसूल खात्यामार्फत सोडवावा, या निर्णयामुळे महसूल खात्यातही आर्थिक भर पडेल, तरी आपण यासाठी त्वरित निर्णय घ्यावा. अशी मागणी परिसरातील जनतेच्या वतीने मूळचे सावळीविहीर येथील रहिवासी परंतु सध्या कल्याण डोंबिवलीचे काँग्रेसचे अध्यक्ष मामा पगारे यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे एका पत्रकान्वये केली आहे.
close